पुणे

विठ्ठल रुक्मिणी मुर्तीवरील रासायनिक प्रक्रियेला न्यायालयाची स्थगिती

CD

श्री विठ्ठलाचे संग्रहित छायाचित्र

श्री विठ्ठल मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेला स्थगिती
पंढरपूर न्यायालयाचा निर्णय; मंदिर समितीकडून वरिष्ठ न्यायालयात अपील

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. २२ : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर करण्यात येणाऱ्या रासायनिक लेपन प्रक्रियेला पंढरपूर येथील कनिष्ठ दिवाणी न्यायालयाने सोमवारी (ता. २२) अंतरिम स्थगिती दिली. राष्ट्रीय मंदिर महासंघाच्या वतीने गणेश लंके व बाळासाहेब डिंगरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत मूर्तीवर कोणतीही रासायनिक प्रक्रिया करू नये, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मूर्ती संवर्धनाचे काम सध्या लांबणीवर पडले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मंदिर दर्शनासाठी नियमित खुले राहणार आहे. दरम्यान, या आदेशाविरोधात मंदिर समितीने वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले असून मंगळवारी (ता. २३) त्यावर सुनावणी होणार आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या चरणांची झीज झाल्याने तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने रासायनिक लेपन प्रक्रियेची शिफारस केली होती. त्यानुसार मंदिर समितीने विधी व न्याय विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. परवानगी मिळाल्यानंतर सोमवार ते बुधवार या कालावधीत ही प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते. तसेच २३ व २४ जून रोजी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, राष्ट्रीय मंदिर महासंघाने या निर्णयाला विरोध करत मूर्तीवर रासायनिक लेपन न करता आयुर्वेदिक व्रजलेप करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका कनिष्ठ दिवाणी न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर शनिवारी (ता. २०) सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायाधीश सोनाली राऊत यांनी पुढील आदेश येईपर्यंत रासायनिक लेपन प्रक्रियेला स्थगिती दिली.
स्वयंभू मूर्तीच्या चरणांना भाविकांना पदस्पर्श करता येत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. ही झीज भरून काढण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सुरुवातीपासूनच काही महाराज मंडळी आणि राष्ट्रीय मंदिर महासंघाने या प्रक्रियेला विरोध दर्शविला होता. मंदिर समितीने काही मूर्ती तज्ज्ञांची पाहणीही करून घेतली होती. त्यावेळी मूर्तीवर व्रजलेप करण्याची सूचना करण्यात आली होती. तथापि, मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार रासायनिक लेपन प्रक्रियेवर भर दिला होता. आता न्यायालयाच्या आदेशामुळे या प्रक्रियेला तूर्तास ब्रेक लागला आहे.

कोट
‘‘श्री विठ्ठल-रुक्मिणीवर लाखो भाविकांची श्रद्धा आहे. श्रद्धेला तडा जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. मूर्तीमध्ये देवत्व असते. अशा मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या यापूर्वीच्या निर्णयाचा आधार घेत येथील न्यायालयाने लेपन प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे.’’
- ॲड. धनंजय रानडे, वकील, मंदिर महासंघ

मंदिर दर्शनासाठी नियमित खुले राहणार
तज्ज्ञांनी दिलेल्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार २२ ते २४ जून या कालावधीत मूर्ती संवर्धनाचे काम प्रस्तावित होते. त्यामुळे २३ व २४ जून रोजी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, दिवाणी न्यायालयाने संवर्धन प्रक्रियेस अंतरिम स्थगिती दिल्याने प्रस्तावित कामकाज सध्या थांबविण्यात आले आहे. या आदेशाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करण्यात आले असून त्यावरील सुनावणी २३ जून रोजी होणार आहे. त्यामुळे २३ व २४ जून रोजी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी नियमितपणे खुले राहील, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT