पुणे

भंग पावलेल्या 37 परिवार देवतांच्या मूर्ती बदलणार

CD

श्री विठ्ठल मंदिर व परिसरातील
परिवार देवतांच्या ३७ मूर्ती बदलणार

गहिनीनाथ महाराज औसेकर; देवतांच्या ५० पैकी ३७ मूर्ती पावल्या भंग

सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर, ता. १ ः श्री विठ्ठल मंदिरातील व परिसरातील परिवार देवतांच्या भंगलेल्या ३७ मूर्ती बदलून त्या ठिकाणी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज येथे दिली.
सुमारे ७४ कोटी रुपये खर्च करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मंदिराबरोबरच मंदिरातील व परिसरातील सुमारे ५० परिवार देवतांपैकी ३७ परिवार देवतांच्या मूर्ती भंग पावलेल्या आहेत. त्या ठिकाणी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. मंदिर जतन व संवर्धन कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये संपूर्ण कामाचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. श्री विठ्ठल मंदिर व परिसरात एकूण ५२ परिवार देवता आहेत. या सर्व देवतांच्या मंदिरांचेही जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणची कामे पूर्ण झाली आहे. तर काही कामे अपूर्ण आहेत. यामध्ये पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुचवल्यानुसार सुमारे ३७ परिवार देवतांच्या मूर्ती बदलण्यात येणार आहेत. हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात भग्नमूर्ती पूजेसाठी ठेवली जात नसल्याने आता भग्न पावलेल्या या शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्ती बदलल्या जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Day: होळी, मोहरम आणि गांधीजयंती दिनी दारूची दुकाने उघडण्यास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय, उत्पादन शुल्क धोरणात बदल

'सैराट'मधून किती पैसे मिळाले? रिंकूने असं काय म्हटलं की होतेय ट्रोल? वाचून तूम्हीही म्हणाल- काहीही हा श्री

Igatpuri News : सावधान! तुम्ही खात असलेली कुल्फी 'विष' तर नाही? इगतपुरीत बनावट कुल्फी कारखान्याचा पर्दाफाश

Ramadan Moon Sighting Rules : इस्लाममध्ये रमजान पवित्र का मानला जातो? 'या' पाच स्तंभांना का आहे महत्त्व?

Gas and Headache: गॅस डोक्यात जातो का? ‘या’ 4 लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT