पुणे

म्हसवड पालिका उपाध्यक्षपदी श्रीदेवी पिसे यांची निवड

CD

म्हसवड पालिकेच्या उपाध्यक्षपदी श्रीदेवी पिसे

मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड

म्हसवड, ता. १६ ः येथील पालिकेच्या उपाध्यक्षपदी भाजपच्या श्रीदेवी निशांत पिसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. मुख्याधिकारी डॉ. सचिन माने व नगराध्यक्षा पूजा वीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालिका सभागृहात उपनगराध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम झाला.
म्हसवड पालिकेत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्याही सर्व जागा जिंकून विरोधकांना २१-० अशी धूळ चारत पालिकेची सत्ता ताब्यात घेतली आहे. मंत्री गोरे यांनी उपाध्यक्षपदासाठी शहरातील एका सर्वसामान्य कुटुंबातील श्रीदेवी पिसे यांची निवड केली.
दरम्यान, पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी श्रीदेवी पिसे यांची निवड जाहीर होताच पालिकेबाहेर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत ‘जय हो’चा नारा दिला. श्रीदेवी पिसे यांची निवड झाल्याबद्दल मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांनी त्यांचे प्रशासनातर्फे सर्वप्रथम अभिनंदन केले. याबरोबरच नगराध्यक्षा पूजा वीरकर व उपस्थित नगरसेवकांनी श्रीदेवी पिसे यांचे अभिनंदन केले. पालिकेत नगराध्यक्षा व उपाध्यक्षा या दोन्हीही महिलाच असल्याने शहरातील महिलांचे प्रश्न व त्यांच्या अडचणी लवकरच सुटतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य महिलांतून व्यक्त होत आहे.
--------------------------
‘स्वीकृत’चा निर्णय प्रलंबित

पालिका सभागृहात आज उपाध्यक्षपदासह स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या होणे अपेक्षित होतेल; परंतु आज महापालिकेच्या निवडणुकीचे निकाल असल्यामुळे मंत्री गोरे यांनी स्वीकृत नगरसेवक नियुक्तीबाबचा निर्णय प्रलंबित ठेवल्याची चर्चा होती.
---------------------------
02369
म्हसवड : श्रीदेवी पिसे यांचे अभिनंदन करताना डॉ. सचिन माने. त्या वेळी पूजा वीरकर.
---------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT