टिळक स्मारक मंदिर - युवा पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी डॉ. संजय जोशी, उमाकांत जोशी, केदार कुलकर्णी, गणेश कुलकर्णी, श्रीकृष्ण चितळे, बेला शेंडे, चारुहास पंडित, विश्राम कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, श्रीकांत जोशी आदी.
टिळक स्मारक मंदिर - युवा पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी डॉ. संजय जोशी, उमाकांत जोशी, केदार कुलकर्णी, गणेश कुलकर्णी, श्रीकृष्ण चितळे, बेला शेंडे, चारुहास पंडित, विश्राम कुलकर्णी, जयंत कुलकर्णी, श्रीकांत जोशी आदी. 
पुणे

नव्या पिढीवर जबाबदारी टाकावी - श्रीकृष्ण चितळे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - उद्योग उभारताना आणि वाढविताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी असायला हवी. नव्या पिढीवर विश्वास टाकून, त्यांच्यावर जबाबदारी सोपवली, तर तेही जिद्दीने आणि मेहनतीने व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करतात. एखाद्या मुलाच्या मनात व्यवसाय करण्याचा विचार आला, तर पालकांनी त्याला पाठबळ द्यायला हवे, असे मत उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांनी व्यक्त केले.

शुक्‍ल यजुर्वेदिय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्‍य उद्योजक विकास अभियानाचा (युवा) वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्त चंद्रकांत जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘युवा उद्योजक’ पुरस्कार भृंगराज तेल कंपनीचे गणेश आणि केदार कुलकर्णी यांना; तर सृजन आर्ट गॅलरीपुरस्कृत ‘सृजन युवा’ पुरस्कार गायिका बेला शेंडे यांना चितळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. राजन कुलकर्णी व शौनक पानसे यांना युवा उत्कर्ष पुरस्काराने, तर नारायण पेठेतील आपली राहती वास्तू देणगीस्वरूपात देणाऱ्या डॉ. अनिल गांधी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उमाकांत जोशी, विश्राम कुलकर्णी, डॉ. संजय जोशी, ‘युवा’चे श्रीकांत जोशी, सृजन आर्ट गॅलरीचे चारुहास पंडित, मंजूषा वैद्य, तृप्ती नानल, मिलिंद दार्वेकर उपस्थित होते.

बेला शेंडे म्हणाल्या, ‘‘गायनाचा वारसा असला तरी मेहनत आणि रियाज महत्त्वाचा आहे. करिअरमध्ये चढ-उतार आले तरी तुम्ही सामोरे कसे जाता, यावर यश अवलंबून असते. प्रत्येक गाणे नवे आव्हान असते. त्यासाठी सतत सराव करते.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT