पुणे

शिरूरमध्ये सामाजिक शैक्षणिक उपक्रमांना प्राधान्य

CD

श्रीमंत हलवाई चौक मंडळ, गेंदाबाई चौक, शिरूर
स्थापना - १९४७
अध्यक्ष - मयुर काळे, उपाध्यक्ष - वैभव लांडे


राज्य शासनाने महागणेशोत्सव हा कार्यक्रम हाती घेतला होता. या अंतर्गत घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक श्रीमंत हलवाई चौक गणेश मित्र मंडळ ट्रस्ट मंडळाने पटकाविला. मंडळाची मूर्ती दगडूशेठ हलवाई गणपती प्रमाणे असून, ती चाळीस वर्षांपूर्वीची आहे.
गणेशोत्सवानंतर ही मूर्ती ठेवण्यासाठी मंडळाच्या वतीने हलवाई चौकात संगमरवरी व मार्बलचे मंदिर साकारले. तेथे ‘श्रीं’ची दैनंदिन पूजा केली जाते. धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ शैक्षणिक उपक्रमही प्राधान्याने घेते. दरवर्षी शिक्षक प्रेरणा पुरस्काराने पाच शिक्षकांना गौरविले जाते. आत्तापर्यंत तीस शिक्षकांचा सन्मान केला असून, राष्ट्रपती पुरस्कार विजेते १०२ वर्षीय आदर्श शिक्षक हरिभाऊ पानसरे यांचाही नुकताच सन्मान करण्यात आला आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी शालेय साहित्याचे वाटप केले जाते. रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनही केले जाते. कोरोना काळात अन्नाची पाकिटे, जीवनावश्यक वस्तूंचे किट भेट देण्यात आले. सांगली, महाड येथील पूरग्रस्तांसाठी त्यांच्या गावी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. दरवर्षी परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाचा पर्यावरणपूरक सजावटींवर भर असतो. मंडळाच्या गणपतीचा मंडपही खड्डेविरहित असतो.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजविण्याच्या हेतूने यावर्षी विविध पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमांतर्गत पोलिस, सफाई कामगारांना पौष्टिक पदार्थांचे वाटप केले जाणार आहे. महिलांचा गणेशोत्सवातील सहभाग वाढावा, यासाठी महिलांच्या महाआरतीचे तसेच अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT