पुणे

शिरूरमध्ये गोळीबारामुळे तणावाचे वातावरण

CD

शिरूर, ता. १९ : शहराच्या भरवस्तीत शुक्रवारी (ता. १८) पहाटे पूर्ववैमनस्य आणि पैशांच्या वादातून झालेल्या गोळीबारात हरीश उर्फ हरी दादाभाऊ गंगावणे (वय ३३) या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिरूर परिसरात तणावाचे वातावरण असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथके रवाना केली आहेत.
रोहित रवींद्र सोनवणे (रा. करडे, ता. शिरूर), अनिकेत विलास गव्हाणे व आदित्य पिंटू पवार (दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदे) यांनी बेकायदा गावठी पिस्तूलमधून बेछूट गोळीबार करून ही हत्या केली. लाटेआळी परिसरात पहाटे साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी दहशतीसाठी हवेतही गोळीबार केला. या घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अजिंक्य अंकुश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटनेच्या रात्री लाटेआळीतील एका शेडमध्ये पत्ते खेळताना पैशांवरून वाद झाला होता. हरीश गंगावणे याच्या खिशातील दोन लाख रुपये घेतल्याच्या संशयावरून रोहित आणि अनिकेत यांच्याशी त्याचा वाद झाला. त्यानंतर आरोपींनी हरीशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा वाद मिटवण्यासाठी हरीश मध्यस्थीकडे गेला असता, दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार केला. रोहितने झाडलेली गोळी हरीशच्या कानामागून गळ्यात शिरल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील अवैध धंदे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या समित्यांच्या बैठकीत चहापानावर लाखोंचा खर्च; निविदेविना बिले मंजूर होत असल्याचे उघड

Pune News: ईडब्ल्यूएस संशोधक विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा; ‘अमृत’कडून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT