गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचा
विवेक कोल्हे यांचा श्रीरामपूरमध्ये गंभीर इशारा
श्रीरामपूर, ता. १५ : राज्यात मुंबईनंतर अहिल्यानगर जिल्हा गुन्हेगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही अत्यंत भयानक परिस्थिती आहे. वेळीच या गुन्हेगारी प्रवृत्तींना ठेचले नाही, तर उद्या हे संकट प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही, असा इशारा आमदार विवेक कोल्हे यांनी दिला आहे.
श्रीरामपूर येथील उद्योजक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर कोल्हे यांनी दुबय्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पोलिस यंत्रणा व स्थानिक लोकप्रतिनिधींवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. आकाश दुबय्या यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, एक होतकरू उद्योजक या घटनेत गमावला गेला आहे. अशा घटना एका दिवसात घडत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून वाढत असलेल्या गुन्हेगारीकडे वेळेत लक्ष न दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. श्रीरामपूरमध्ये अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त झाल्याचा उल्लेख करत त्यांनी शहरात व्यसनाधारित गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यात जप्त झालेल्या अमली पदार्थांपैकी सुमारे १७ कोटी रुपयांचा साठा श्रीरामपूरमध्ये आढळल्याचे सांगत त्यांनी कायदा व सुव्यवस्था यंत्रणेने अधिक प्रभावी कारवाई करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
आकाश दुबय्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईसह सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीबाबतही पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कमी गुन्हे दाखल असलेल्यांवर तडीपारीची कारवाई होत असताना गंभीर गुन्ह्यांतील काही आरोपींची नावे तडीपार यादीत नसल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
सामाजिक संघटनांनी गोपनीय हेल्पलाइन सुरू करून नागरिकांकडून गुन्हेगारीविषयी माहिती संकलित करावी, अशी सूचनाही त्यांनी केली, तसेच शहरातील ब्लॅक फिल्म लावलेल्या व क्रमांक फलक नसलेल्या वाहनांवर, तसेच सोशल मीडियावर हिंसाचाराचे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांनी स्वतःहून गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
---------
विशेष मोहीम हाती घ्या
आकाश दुबय्या यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या कुटुंबासोबत ठामपणे उभे राहू, असे सांगतानाच पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, पोलिस व महसूल प्रशासनाने पक्षीय भेद बाजूला ठेवून जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीविरोधात संयुक्त विशेष मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.