मुंढवा येथील राम मंदिरात राम जन्मासमयी रामाचा पाळणा म्हणताना महिला व ग्रामस्त sakal
पुणे

केशवनगर-मुंढवा-कोरेगाव पार्कमध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

अखंड हरिनाम महोत्सव तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला.

सकाळ वृत्तसेवा

मुंढवा : केशवनगर-मुंढवा-कोरेगाव पार्क परिसरात गुडीपाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली होती. त्याची सांगता समारंभ चैत्र शुध्द नवमीला राम जन्म सोहळ्याने पार पडली. या कालावधीत भजन, किर्तन,प्रवचन, राम कथा, व महाप्रसाद अश्या कार्यक्रमांनी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मुंढवा येथील राम मंदिरात ग्रंथराज दासबोध पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा पार पडला. गुडी पाडव्यापासूनचराम मंदिरात भजन, प्रवचन, किर्तनास सुरूवात झाली होती. अखंड हरिनाम महोत्सव तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला. हभप दत्तात्रय महाराज धुमाळ यांचे किर्तन राम जन्मासमयी झाले.

दिगंबर गायकवाड, अंकुश लोणकर, राजेंद्र जगताप, माऊली ताम्हाने, वसंत लोणकर, वामनआबा जगताप व मुंढवा ग्रामस्तयांनी नियोजन केले. केशवनगर लोणकर वस्ती येथे श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भव्य स्टेज घालण्यात येवून त्यावर श्रीरामांची साडेपाच फुटांची मुर्ती उभारून आरास केला होता.लाईटींग ची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन चौधरी यांनी केले. अविनाश गायकवाड, प्रभू धुमाळ, अभी वाघमोडे, संकेत प्रसाद, शिवा कंदेल,सुरज व विकी चौघरी, अवि लोणकर, अनिकेत बारगुजे यांनी परिश्रम घेतले.कोरेगाव पार्क परिसरात साई मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात येवून महप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT