गरज पडल्यासच दोन कॉलम फोट घ्यावा
अन्यथा आमदार हेमंत ओगले यांचा पासपोर्ट फोटो घ्यावा
SHR26B12281
श्रीरामपूर : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार हेमंत ओगले. समवेत माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रकाश चित्ते, नगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर.
चार गुंडांवर ‘मोक्का’ ही सुरुवात, लढा सुरू राहील
सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषदेत भूमिका; बेग, जेधे टोळ्यांविरोधातील उपोषण मागे
सकाळ वृत्तसेवा
श्रीरामपूर, ता. ४ : शहरातील वाढत्या संघटित गुन्हेगारीविरोधात सकल श्रीरामपूरकरांनी पुकारलेल्या लढ्याला पहिले यश आले आहे. पोलिसांनी चार प्रमुख गुंडांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केल्याची माहिती मिळताच महात्मा गांधी चौकातील उपोषण शनिवारी रात्री मागे घेण्यात आले. मात्र, शहरातील गुन्हेगारीचे पूर्ण उच्चाटन होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा स्पष्ट इशारा आमदार हेमंत ओगले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दिला.
आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर श्रीरामपूरकरांचा रोष उफाळून आला होता. सलग चार दिवस कडकडीत बंद आणि विराट मोर्चानंतर २ ऑक्टोबरपासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर प्रकाश चित्ते व कुणाल दुबय्या यांनी उपोषण सुरू केले होते. त्यात आमदार ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांनीही सहभाग घेतला. अखेर पोलिसांनी गोरख जेधे, सोन्या बेग, अंकुश जेधे व मनोज साबळे यांच्यावर ''मोक्का'' लावल्याचे पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
नेत्यांनी स्पष्ट केले की, ही लढ्याची केवळ सुरुवात आहे. सोन्या बेग व गोरख जेधे अटकेत असले, तरी अंकुश जेधे आणि मनोज साबळे अद्याप फरार आहेत. शहरात अमली पदार्थांची विक्री, बेकायदेशीर जमिनींचे ताबे आणि आर्थिक गुन्हेगारी अद्याप पूर्णपणे रोखली गेलेली नाही. त्यामुळे आंदोलन संपलेले नसून, केवळ स्थगित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असली, तरी सर्व आरोपी गजाआड होईपर्यंत पोलिस प्रशासनावर दबाव कायम ठेवला जाईल.
या आंदोलनाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार विवेक कोल्हे आणि महंत रामगिरी महाराज, भास्करगिरी महाराज यांच्यासह विविध नेत्यांनी पाठबळ दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. याच वेळी बोलताना प्रकाश चित्ते म्हणाले की, शांतताप्रिय हिंदू कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांना बाहेरील काही नेत्यांचे पाठबळ मिळत आहे. अशा पाठिराख्यांनी श्रीरामपुरातील १०० पीडित हिंदू कुटुंबांची भेट घेऊन मगच आपली भूमिका ठरवावी.
यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सचिन गुजर, कुणाल दुबय्या, सुनील मुथा, गौतम उपाध्ये, नगरसेवक दीपक चव्हाण, रवी पाटील, राजेंद्र कांबळे, किरण लुणिया, बाळासाहेब खाबिया, संजय पांडे व नितीन लांडे आदी उपस्थित होते.
चौकट---
गुन्हेगारांची माहिती शिंदेंना देणार
दरम्यान, शिवसेनेत राहून गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली जाईल, असे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.