पुणे

श्रीरामपुरात दोन व्यापाऱ्यांच्या घरांवर दरोड्याचा प्रयत्न

CD

श्रीरामपूर ः व्यापाऱ्यांच्या घरांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणारेसंशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले.


व्यापाऱ्यांच्या घरांवर दरोड्याचा प्रयत्न

पाच संशयित सीसीटीव्हीत कैद; पोलिस निरीक्षकांची घटनास्थळी भेट


श्रीरामपूर, ता. २५ ः शहरातील भरवस्तीत दोन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांच्या घरांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास पाच संशयितांनी प्रथम एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या, त्यानंतर सरस्वती कॉलनीतील किराणा व्यापाऱ्याच्या बंगल्याला लक्ष्य केले. मात्र, दोन्ही ठिकाणी त्यांचे प्रयत्न फसल्याने संभाव्य दरोड्याची घटना टळली. या संशयितांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या घरात शिरण्याचा प्रयत्न संशयितांनी केला. मात्र, दरवाजा उघडण्यात यश न आल्याने त्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर त्यांनी सरस्वती कॉलनीतील किराणा व्यापाऱ्याच्या बंगल्याकडे मोर्चा वळविला. तेथेही त्यांना यश आले नाही. एकाच रात्री दोन ठिकाणी दरोडा टाकण्याचे प्रयत्न झाल्याने शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या पाचही संशयितांनी डोक्याला फडके बांधले असून, त्यांच्या अंगात हाफ पॅन्ट असल्याचे सीसीटीव्ही चित्रणातून दिसत आहे. दोन्ही घटनांमध्ये जीवितहानी किंवा आर्थिक नुकसान झाले नसल्याने संबंधितांनी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, हा प्रकार गांभीर्याने घेत व्यापाऱ्यांनी सायंकाळी पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांची भेट घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. खैरे यांनी तातडीने पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : चक्रीवादळाने रौद्ररूप धरले! ताशी १०० किमी वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा; 'या' राज्यांत मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात काय घडणार?

फ्लिपकार्टच्या गोदामातून ९८० सॅमसंग मोबाईल चोरीला; पुरावा मिळू नये म्हणून CCTV चा डीव्हीआरही पळवला...

Jamgaon News: रविवारी सुट्टी असतानाही सीईओंची जामगावला भेट; अपघातात मृत सेविकेच्या कुटुंबीयांचे सांत्वन

IND W VS ZIM W 2ND ODI NEWS: हरमनप्रीत दीप्तीची शतके, वैष्णवीची गोलंदाजीत कमाल! झिम्बाब्वेला लोळवत भारताने मालिका खिशात घातली

Dutch Farmers: डच ट्रॅक्टर रस्त्यावर, मागणी संसदेच्या टेबलावर; नायट्रोजन संघर्षाची सात वर्षे; २०३५चे लक्ष्य ठरले, पण डच शेतकऱ्यांना हवी आहे स्पष्टता

SCROLL FOR NEXT