पुणे

आंबळे अपघातप्रकरणी ट्रकचालक जेरबंद

CD

न्हावरे, ता. ५ : आंबळे (ता. शिरूर) येथे शिरूर-चौफुला रस्त्यावर तिघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अपघातातील फरार ट्रकचालकास शिरूर पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर राजू केदार (वय २७, रा. वारणे, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी ट्रकही ताब्यात घेतला आहे.
गुरुवारी (ता. २९) रात्री आंबळे येथील अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन ऐकून कौशल्या वसंत झेंडे, सोहम राजीव झेंडे, आरुषी दत्तात्रेय झेंडे व ज्योती राजीव झेंडे हे पायी घरी जात होते. यावेळी एमएच १६-सीई ६७८७ या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिली. या भीषण अपघातात कौशल्या झेंडे, आरुषी झेंडे व सोहम झेंडे यांचा मृत्यू झाला, तर ज्योती झेंडे जखमी झाल्या. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला होता.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत होता. शिरूर पोलिसांनी कारेगाव आणि अहिल्यानगर मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून अथक परिश्रमानंतर ट्रकचा शोध लावला. हा ट्रक सोमनाथ विष्णू आंधळे (रा. लिंबोडी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Payments: ऐन दिवाळीत Google Pay डाऊन? ऑनलाइन पेमेंट करताना अनेकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : घाबरायचे नसते, त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

SCROLL FOR NEXT