रयत स्पर्धा केंद्रातर्फे
शुभम पाटलांचा सत्कार
सातारा, ता. २२ ः यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील रयत स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात भारतीय वन सेवेत (आयएफएस) निवड झालेले माजी विद्यार्थी शुभम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी आणि यशापर्यंतचा प्रवास’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले.
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे सचिव किशोर राजेनिंबाळकर, प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे उपस्थित होते. श्री. पाटील यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीतील अनुभव, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य संदर्भसाहित्याची निवड आणि ध्येयाप्रती असलेली जिद्द यांविषयी मार्गदर्शन केले. श्री. राजेनिंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. साळुंखे यांनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध शैक्षणिक संधींचा लाभ घेऊन उच्च ध्येय निश्चित करावे आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन केले.
केंद्राचे संचालक प्रा. डॉ. गणेश कोकाटे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण कोळपे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुशील यादव यांनी आभार मानले.
PNE26W60801
सातारा ः यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये कार्यक्रमात बोलताना शुभम पाटील. त्यावेळी किशोर राजेनिंबाळकर, प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे आदी.
.................चिंचकर..............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.