Shweta-Ratanpure
Shweta-Ratanpure 
पुणे

'वर्ल्ड स्किल्स'मध्ये श्वेताची ब्रॉंझपदकाची कमाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रशियाच्या काझानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय कौशल्य ऑलिम्पिक "वर्ल्ड स्किल्स' स्पर्धेत ग्राफिक डिझाइन टेक्‍नॉलॉजी प्रकारात श्वेता रतनपुरा हिने ब्रॉंझपदक पटकावले आहे. देशासाठी या प्रकारात ब्रॉंझपदक पटकावणारी श्वेता ही पहिली भारतीय विद्यार्थिनी ठरली आहे.

केंद्र सरकारच्या "राष्ट्रीय कौशल्य विकास मिशन'अंतर्गत श्वेताने देशाचे प्रतिनिधित्व केले. तिच्या या कामगिरीबद्दल शहरातील "डिझाइन मीडिया आणि एंटरटेन्मेंट' स्कूलच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी उद्योजक जयप्रकाश श्रॉफ, डिझाइन मीडियाचे संचालक आणि श्वेताचे मार्गदर्शक सतीश नारायणन, श्रीदेवी सतीश, श्वेताचे वडील विनीतकुमार, आई अमिता, विप्लव पाटीदार आदी उपस्थित होते.
63 देशांमधील 1354 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. 44 विविध प्रकारच्या कौशल्यांसह 48 जणांचा भारतीय संघ या स्पर्धेत उतरला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाने इतिहास रचत एक सुवर्ण, एक रौप्य, दोन ब्रॉंझ यांसह 15 स्पर्धकांनी "मेडल ऑफ एक्‍सलन्स' मिळविले आहे.

जगभरातील 35 स्पर्धकांशी माझा सामना होता. स्पर्धेसाठी नारायणन यांचे मार्गदर्शन, आई-वडिलांचा पाठिंबा आणि नियमित व्यायाम, योगा व ध्यान उपयुक्त ठरले. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवतानाच माझ्यातील नकारात्मक गोष्टी शोधून काढल्या आणि त्यावर काम केले.
- श्वेता रतनपुरा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अभिषेक पोरेलचे आक्रमक अर्धशतक, दिल्लीच्या 120 धावा पार

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT