श्यामाप्रसाद मुखर्जींचे
योगदान अभ्यासक्रमात
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींची घोषणा : प्रणवानंदांचाही समावेश
कोलकाता, ता. ५ (पीटीआय) : ‘‘भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भारत सेवाश्रम संघाचे संस्थापक स्वामी प्रणबानंद यांच्या योगदानाचा राज्यातील शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे,’’ अशी घोषणा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी शनिवारी केली. ‘‘त्यांच्या योगदानामुळेच पश्चिम बंगालचे अस्तित्व टिकून राहिले, ’’असा दावाही त्यांनी केला
राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्री अधिकारी यांनी महिला शिक्षणाला चालना देणारे समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर, माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांना आदरांजली वाहिली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अधिकारी यांनी सांगितले, की तृणमूल काँग्रेस सरकारच्या काळात शाळांमधील पायाभूत सुविधा आणि मूलभूत सोयींकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे राज्यातील सुमारे १९ हजार शाळांमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. या शाळांसाठी भाजप सरकारने ३०० कोटी रुपयांचे एकत्रित अनुदान मंजूर केले आहे.
“भारताच्या फाळणीच्या काळात कोट्यवधी हिंदूंचे प्राण वाचविण्यात श्यामाप्रसाद मुखर्जी आणि स्वामी प्रणवानंद यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. पश्चिम बंगालच्या निर्मितीतही त्यांचे योगदान होते. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा आणि त्यागाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करू. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन अनिवार्य करण्यात आहे,” असे अधिकारी यांनी सांगितले .“पश्चिम बंगालला पुन्हा एकदा देशातील क्रमांक एकचे राज्य बनवू,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
तृणमूल काँग्रेस सरकारने विशिष्ट समाजातील विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षण संस्थांमध्ये विशेष सवलती दिल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. मात्र आपल्या सरकारचा दृष्टिकोन सर्वसमावेशक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रात व्यापक सुधारणा करण्याची गरज व्यक्त करताना अधिकारी म्हणाले, की शाळांच्या कामगिरीच्या आधारे त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खो-खो, कबड्डी यांसारख्या पारंपरिक खेळांसह राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षणावर भर दिला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.