2Make_Pune_Safe.jpg
2Make_Pune_Safe.jpg 
पुणे

कष्टाळू श्‍यामरावांसाठी अश्रूंचा फुटला बांध 

सकाळवृत्तसेवा

नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील श्‍यामराव कासार (वय 70) यांचा होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या आठवणींनी रविकिरण हाइट्‌समधील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. मूळचे सावदा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील कासार यांनी अतिशय कष्टातून मुलगा सुनील याला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियंता बनविले होते

सुनीलही एका मोठ्या बांधकाम कंपनीत कामाला आहे. असे असले तरी कष्टाळू श्‍यामरावांनी घरगुती मसाले व सिझनेबल वस्तू विकण्याचा व्यवसाय बंद केला नव्हता. आठवडे बाजार, कृष्णा चौक या ठिकाणी ते मसाल्यांबरोबर, धान्यपुडे, पूजा साहित्य विकण्याचे काम करीत. त्याच व्यवसायानिमित्त ते पुण्याला गेले असता काळाने त्यांच्यावर झडप घातली. 

शुक्रवारी रात्री त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या वेळी सोसायटीतील सर्वांनाच त्यांच्या अचानक जाण्यामुळे अश्रूंचा बांध आवरणे अवघड झाले होते. शनिवारी मूळ गावी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष संतोष जमदाडे यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT