‘एसआयआर’ नोंदणीवेळी रिव्हॉल्व्हर रोखले
गवळेवाडीतील घटना; जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी एकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. ७ : गवळेवाडी (ता. माढा) येथे ‘एसआयआर’मध्ये नातेवाइकाचे नाव नोंदवण्याच्या कारणावरून एकावर रिव्हॉल्व्हर रोखून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजकुमार गवळी (रा. गवळेवाडी, ता. माढा) याला कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला माढा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
ही घटना ता. ५ रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत जिल्हा परिषद शाळेत घडली. याबाबत पोपट गवळी (रा. गवळेवाडी) यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गवळेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बी.एल.ओ. सोनवणे यांचे एसआयआर नोंदणीचे काम सुरू होते. त्यावेळी फिर्यादी आपल्या नातेवाइकांची कागदपत्रे घेऊन नोंदणीसाठी गेले होते. त्याच वेळी गावातील राजकुमार गवळी तेथे आला. त्याने पोपट सरडे आणि वंदना सरडे यांची नावे नोंदवण्यास आक्षेप घेत फिर्यादीशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
हा वाद सुरू असताना फिर्यादीने व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी खिशातून मोबाईल काढला. त्याच वेळी राजकुमार गवळी याने कमरेला शर्टने झाकून ठेवलेली रिव्हॉल्व्हर काढून फिर्यादीवर रोखली आणि, ‘तुला जिवंत ठेवणार नाही,’ अशी धमकी दिली. हा प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेल्या दोघांनी मध्यस्थी केली. त्यांनी फिर्यादीला शाळेच्या एका वर्गखोलीत ढकलून बाहेरून दरवाजा लावून घेतला. त्यानंतर राजकुमार याने मध्यस्थी करणाऱ्या दोघांवरही रिव्हॉल्व्हर रोखून, ‘तुम्ही मध्ये येऊ नका, नाहीतर मी तुम्हालाही सोडणार नाही,’ असे म्हणत धमकावले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.