fraud  sakal
पुणे

आजारी मालकाला ड्रायव्हरने घातला ५१ लाखांना गंडा

मालक आजारी असल्याचे सांगून बांधकामासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून वेळोवेळी बँकेतून पैसे काढले.

सकाळ वृत्तसेवा

मालक आजारी असल्याचे सांगून बांधकामासाठी पैशांची गरज असल्याचे भासवून वेळोवेळी बँकेतून पैसे काढले.

कॅन्टोन्मेंट - मालक आजारी असल्याचे सांगून बांधकामासाठी पैशांची (Money) गरज असल्याचे भासवून वेळोवेळी बँकेतून पैसे काढले. कागदपत्रावर सह्या घेऊन त्यांची मोटार व मोटारसायकल विकून तब्बल ५१ लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.

शाहिन रफिक छागला (वय ४०, रा. कुल होम्स, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरीफ ऊर्फ हनिफ सय्यद, हनिफ दस्तगीर सय्यद (वय ३९, रा. एन आय बी एम रोड, कोंढवा) व त्यांची पत्नी, बहिण, भाऊ यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरीफ सय्यद हा फिर्यादी यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करतो. फिर्यादी यांचे पती आजारी आहेत. आरीफ याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन वडगाव शेरी येथील बांधकाम साईटवरील वेगवेगळ्या कामासाठी पैशांची आवश्यकता आहे, असे भासवले. त्याने पत्नी, भाऊ, बहिणीशी संगनमत करुन फिर्यादी यांच्याकडून २५ लाख रुपये बँकेतून काढून घेतले. फिर्यादी यांची चारचाकी गाडी फिर्यादीच्या परवानगीविना आरटीओकडील टीटी फॉर्मवर खोटी सही करुन साडेसात लाख रुपयांना विकली. तसेच त्यांची मोटारसायकल घेऊन अशी एकूण ५१ लाख रुपयांची फसवणूक केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक मोहिते अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Service : नागपूरहून एअर इंडियाची बंगळुरू विमानसेवा सुरू

Hit and Run : समृद्धी महामार्गावर हिट ॲण्ड रन; महिलेचा अपघाती मृत्यू, दोघे गंभीर जखमी, चालक फरार

Nagarparishad Election : राज्यातल्या २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु; तगडा पोलिस बंदोबस्त, यंत्रणा अलर्टवर

नवरा-नवरी बचावली ! 'विवाहानंतर देवदर्शानास निघालेल्या वाहनावर काळाचा घाला'; पाच जण जागीच ठार, दाेनजण गंभीर जखमी..

Nagpur Crime : ठिय्या मजुरांना ठेवले डांबून; हातपाय तोडण्याची धमकी, तिघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT