Siddharth Shirole  sakal
पुणे

Siddharth Shirole : रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी हवी; शिरोळे

रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली. विधानसभेतील चर्चेत सहभागी होत त्यांनी पुणे शहरातील भूजल पातळी घटत असल्याबाबत चिंता व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली. विधानसभेतील चर्चेत सहभागी होत त्यांनी पुणे शहरातील भूजल पातळी घटत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. पुणे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, ही बाब काही नवीन नाही. अनेक कारणांमुळे पाणीटंचाई दरवर्षीची समस्या झाली आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी आणि विहिरींचे जतन, संवर्धन करण्याची गरज आहे, असे शिरोळे यांनी सांगितले.

पर्यटनाबाबत ठोस निर्णय हवा

शिवाजीनगर : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी सुरक्षा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने आता ठोस निर्णय घ्यायला हवेत, अशी मागणीही शिरोळे यांनी विधानसभेत केली.

मागील महिनाभरात कळसुबाई शिखरावर दोन वेळा पर्यटकांची गर्दी झाली होती. मागील रविवारी एका पर्यटकाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. तोरणा किल्ल्यावरही एका पर्यटकाचा प्राण गेला आहे. ताम्हिणी अभयारण्यातील दोन धबधब्यांमध्ये आत्तापर्यंत तीन पर्यटक वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या धबधब्यावर पाच जण वाहून गेले.

हरिश्चंद्र गडावर गेलेली एक तरुणी पाच दिवस बेपत्ता आहे, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली. याशिवाय सिंहगड, सांदण व्हॅली, हरिहर गड येथै गर्दी होत असते. अपघात, दुर्घटना टाळायच्या असतील तर गर्दीवर नियंत्रण यायला हवे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी, लोणावळा, ताम्हिणी भागातले धबधबे अजून सुरू झालेले नाहीत, तरीसुद्धा गर्दी वाढली आहे. याकडे आमदार शिरोळे यांनी लक्ष वेधले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

SCROLL FOR NEXT