पुणे

वडूज सिध्देश्वर कुरोलीत रविवारपासून यात्रा बातमी

CD

सिद्धेश्वर कुरोलीत रविवारपासून कार्यक्रम

वडूज, ता. १९ : सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त रविवारपासून (ता. २२) २८ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

रविवारी दुपारी बाराला पासिंग व्हॉलिबॉलचे सामने होतील. या स्पर्धेसाठी पाच हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवली आहेत. मंगळवारी (ता. २४) सकाळी दहा वाजता राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा होतील. या सामन्यांसाठी तीन हजार ते १५ हजार रुपयांची बक्षिसे ठेवली आहेत. रात्री बाराला सिद्धेश्वर देवालयाच्या आवारात दहीहंडी व छबिन्याचा कार्यक्रम होईल. बुधवारी (ता. २५) रथोत्सवाचा कार्यक्रम होईल. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी योगेश कदम, पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या हस्ते रथपूजन होईल. मयुरी उत्तेकर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. गुरुवारी (ता. २६) निकाली कुस्त्यांचे मैदान होईल. मैदानासाठी २५ हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत इनाम ठेवले आहे. रात्री स्नेहल पवार यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (ता. २७) सिद्धेश्वर केसरी बैलगाड्यांच्या शर्यती होणार आहेत. या शर्यतीमध्ये विजेत्यांना सात हजारांपासून ९१ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे देण्यात येतील. २८ तारखेला श्वान स्पर्धा होतील. या स्पर्धेसाठी एक हजारापासून ते १५ हजारांपर्यंत बक्षिसे ठेवली आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने केले आहे.
-----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabaleshwar Water Crisis: महाबळेश्वरला कृत्रिम पाणीटंचाई! ऐन पर्यटन हंगामात पाण्यासाठी वणवण; प्राधिकरण-पालिकेत समन्वयाचा अभाव

आमदारांना अपात्र ठरवणाऱ्या याचिका फेटाळून लावा, शिवसेना सुनावणीदरम्यान शिंदेसेनेची मागणी

Marathi News Live Updates : कांदा लागवडीच्या मजुरीला अखेर लगाम; पुरुषांना ८००, महिलांना ७०० रुपये दर निश्चित

शरद पवार मुख्यमंत्री असताना 'झपाटलेला' चित्रपटावेळी काय घडलं होतं? महेश कोठारेंनी सांगितला वर्षांपूर्वीचा किस्सा

Pushkar Mela Viral News : कोट्यावधींची किंमत असलेल्या घोड्यांच्या बाजारात किन्नरची चर्चा; लाखो रुपयांच्या पैशांनी भरलेली पिशवी, समाजमाध्यमांवर व्हायरल

SCROLL FOR NEXT