सिद्धेश्वर कुरोलीत
आज आठवडा बाजार
औंध, ता. १० : सिद्धेश्वर कुरोली येथे ग्रामस्थ व आठवडा बाजार कमिटी यांच्या पुढाकारातून उद्या (ता. ११) पासून आठवडा बाजार सुरू करण्यात येत आहे.
या बाजारामुळे परिसरातील शेतकरी, भाजीपाला विक्रेते, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना खरेदी-विक्रीसाठी सोयीची सुविधा उपलब्ध होणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी थेट बाजारपेठ मिळणार असून, गावाच्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.
सिद्धेश्वर कुरोली येथील आठवडा बाजारात भाजीपाला, फळे, धान्य, किराणा माल, कपडे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची खरेदी-विक्री होणार आहे. बाजारासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजनही बाजार कमिटीमार्फत करण्यात आले आहे.
परिसरातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी या आठवडी बाजारात मोठ्या संख्येने सहभागी होऊन बाजाराच्या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मनोज देशमुख व आठवडा बाजार कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.