पिंपरी : संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महापौर उषा ढोरे यांना घेराव घातला. 
पुणे

संघटनांचा घेराव अन्‌ महापौरांचा माफीनामा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप महापौर उषा ढोरे यांनी गुरुवारी (ता. ९) फेटाळून लावला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत घेराव घातल्याने ‘माझ्या वक्तव्याचा अर्थाचा अनर्थ केला जात आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करते,’ अशा शब्दांत त्यांनी माफी मागितली. 

सांगवीत एका संघटनेतर्फे तीन जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात महापौर ढोरे यांचा सत्कार केला. त्या वेळी भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची पोस्ट बुधवारी (ता. ८) सोशल मीडियावर व्हायरल झाली व विविध स्तरातून आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या. महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, भारिप बहुजन महासंघाने महापौरांचा निषेध करून ढोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 

महापौरांना घेराव
समता परिषद, ओबीसी संघर्ष समिती, नागरी हक्क सुरक्षा समिती आणि समविचारी संस्था-संघटनांनी गुरुवारी (ता. ९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आंदोलन केले. त्यात महापौर ढोरे यांचा निषेध केला. मानव कांबळे, देवेंद्र तायडे, आनंदा कुदळे, विशाल जाधव, पी. के. महाजन, अनिल साळुंखे, संतोष जोगदंड आदींचा आंदोलनात सहभाग होता. त्यांनी महापौर कक्षात ढोरे यांना घेराव घातला. राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली काळभोर, अपर्णा डोके, संगीता ताम्हाणे, सुलक्षणा धर, वैशाली घोडेकर आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT