पुणे

Vidhan Sabha 2019 : पक्ष कार्यालयात शुकशुकाट, लक्ष मतदारसंघात

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात शुकशुकाट होता. तेथे व्यवस्था पहाणारे दोनचार कार्यकर्ते सोडले तर कोणीही फिरकले नाही. सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते मतदारसंघात तयारीला लागले आहेत. इच्छुकांची अवस्था तर धड मतदारसंघात आणि चित्त मुंबईत अशी अवस्था झाली आहे.

गेल्या चार पाच दिवसांपासून विधानसभेची आचारसंहिता कधी लागणार अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. महाजनादेश यात्रा संपली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा झाला तरीही आचारसंहिता लागली नव्हती. वधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी त्यांची मतदारसंघात यंत्रणा उभी करण्याचे, पक्षातील नेत्यांच्या भेटी घेऊन सेटींग लागवण्याचा खटाटोप सुरू केला. तर कॉंग्रेसच्या इच्छुक महिलाना उमेदवारांने तर थेट दिल्ली गाठून उमेदवारी गाळ्यात पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजपच्या जंगली महाराज रस्त्यावरील "सन्मान' येथील पक्ष कार्यालयात महत्वाचे पदाधिकारी दुपार पर्यंत फिरकले नव्हते. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याची तयारी करण्यात सर्व पदाधिकारी व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सकाळी कॉंग्रेस भवन येथे एक चक्कर मारली. त्यानंतर ते देखील त्यांच्या स्वताःच्या निवडणुकीच्या व पक्षाच्या कामासाठी निघून गेले असे तेथील कार्यकर्त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या कार्यालयातही गडबड नव्हती. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मेळावा रविवारी (ता. 22) होणार असून, त्याच्या तयारीत पक्षाचे पदाधिकारी आहेत. डेक्कन येथील शिवसेना भवन व नारायण पेठेतील मनसेचे कार्यालय येथेही शुशुकाट होता.

पक्षाच्या काही कार्यकर्त्यांशी चौकशी केल्यानंतर आता महिनाभरात पक्ष कार्यालयात आता फारसे काही विशेष नाही, जे काही आहे ते मतदारसंघात. त्यामुळे इकडे गर्दी नसणारच असे सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT