पुणे

नियमबाह्य सायलेन्सर मोडिफाय करून बसवू नयेत सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे यांचे आवाह

CD

‘सायलेन्सरच्या आवाजात बदल
करणाऱ्यांवर होणार कारवाई’

पंढरपूर ः शहर व परिसरातील नागरिकांनी आपल्या दुचाकी, विशेषतः बुलेट वाहनांवर कंपनीने नियमाप्रमाणे दिलेले सायलेन्सरच वापरावेत. मोठ्या कर्कश आवाजाचे, नियमबाह्य सायलेन्सर मॉडिफाय करून बसवू नयेत, असे आवाहन सहा. पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे.
पंढरपुरात बुलेट दुचाकीधारकांकडून कंपनीने नियमानुसार दिलेले सायलेन्सर काढून त्याऐवजी मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य सायलेन्सर बसविण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बुलेट सायलन्सरमधील फेरफारामुळे ध्वनीप्रदूषणात वाढ होत असून नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी त्रास सहन करावा लागतो. या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. नागरिकांनी वाहनांमध्ये अनधिकृत बदल न करता वाहतूक नियमांचे पालन करावे. शहरात बुलेट दुचाकीच्या सायलन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्यांवर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात ध्वनी प्रदूषण नियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमांतंर्गत कारवाई करण्यात येईल असेही सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hottest City in India: महाराष्ट्रातला 'हा' जिल्हा ठरला देशातला सर्वात जास्त उष्ण; उद्या मुंबईसह उत्तर कोकणात यलो अलर्ट

Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Big Boss Marathi 6 : प्रेमाची कबुली दिल्यानंतरच नात्यात दुरावा? बिग बॉस ६च्या नव्या प्रोमोने विशाल–रुचिताच्या नात्यावर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : शेळी चोरल्याच्या संशयातून १४ वर्षीय मुलाची हत्या

Nasrapur Crime : कापुरव्होळ येथील उद्योजकाच्या मुलाचे अपहरण; सिनेस्टार्ईल नाकाबंदीने एक तासात मुलगा ताब्यात, अपहरणकर्ते मात्र फरार

SCROLL FOR NEXT