silent march to demand safe roads Protest of citizens in chandni chowk pune marathi news
silent march to demand safe roads Protest of citizens in chandni chowk pune marathi news Sakal
पुणे

Chandani Chowk Bridge : चांदणी चौक की भूलभुलैया ? सुरक्षित रस्त्याच्या मागणीसाठी मूक मोर्चा; कोथरूड परिसरातील नागरिकांचे आंदोलन

जितेंद्र मैड

कोथरुड : चांदणी चौक प्रकल्पामुळे वाहतुक कोंडी सुटेल व विकासाची गती वाढेल ही अपेक्षा होती. परंतु परिसरातील रहिवाशांना असुरक्षित रस्ते, विस्कळीत आणि धोकादायक वाहतूक आणि वाहतूक कोंडी याचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने विविध सोसायटी मधील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले.

अमोल समगीर (वरद हाईटस) - वारजे पासून वाकड पर्यंत कोणत्याही ठिकाणी महामार्गा लगत असणारे सेवा रस्ते हे एकेरी मार्ग नाहीत परंतु वेद भवन शेजारी चांदणी चौकालगत असलेला सेवा रस्ता हा एकेरी मार्ग केला आहे. त्यामुळे आम्हा रहिवाशांना जाण्या येण्यासाठी हक्काचा आणि योग्य असा एकही रस्ता नाही. आम्हालाही सुरक्षित असा रस्ता मिळावा. जोपर्यंत या रस्त्यावर काही मार्ग निघत नाही तोपर्यंत महामार्गा लगतचा रस्ता आम्हाला दुतर्फा वाहतुकीसाठी उपलब्ध करून द्यावा.

मोहन अंतुरकर (सिध्दार्थ पार्क) – वरद कॉलनीकडे येताना वाहतूक नियंत्रक दिवे लावावेत. म्हणजे रस्ता ओलांडायला आधार मिळेल. तीव्र उतार व वीजेचा डीपी असल्यामुळे गाडी वळवणे, उताराने खाली आणणे धोकादायक झाले आहे.

डॉ. मनिषा जाधव (वेदविहार हौ. सौ.)- घरातून बाहेर पडल्या पडल्या बघतो तर उजवीकडे म्हणजेच वारजे ला जायचं असेल तर नो एन्ट्री चा बोर्ड आणि डावीकडून जर कोथरूडला जायचं असेल तरीसुद्धा नो एन्ट्री मग नागरिकांनी बाहेर पडायचे कसे आणि कुठून?

अंडरपासचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हायवेच्या रस्त्यावर बॅरिकेट टाकून तो रस्ता टू वे करावा म्हणजे वेदभवान येथील नागरिकांना एक लेन वारजे कडे जायला उपलब्ध होईल तसेच कोथरूड कडे जाण्यासाठी एक लेन उपलब्ध करून द्यावी.

वेदाचार्य मोरेश्वर घैसास गुरुजी म्हणाले की, एनडीए कडे असा दिशादर्शक फलक लावल्याने गाड्या वेदभवनकडे वळतात. नंतर त्यांना चुक लक्षात येते. येथे हा रस्ता अरुंद आहे. वाहने वेगात येत असतात. त्यामुळे अनेकदा अपघात घडतात. सर्वोच्च न्यायलयात आम्ही जो दावा दाखल केला होता त्यामध्ये न्यायालयाने आमच्या बाजुने निकाल दिला.

परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही केली गेली नसल्याने तो न्यायायाचा अवमान झाला आहे. अवमान याचीका दाखल करण्यासाठी येणारा खर्च आमच्या आवाक्या बाहेरचा आहे. सर्वसामान्य माणूस कधीच रस्त्यावर येत नाही. परंतु असह्य झाल्यामुळे सोसायटीतील माणसे रस्त्यावर येवून आंदोलन करत आहेत.

अखिल वेदभवन मित्र मंडळ अध्यक्ष योगेश कदम म्हणाले की, वेदभवन च्या नागरिकांना हक्काच रोड मिळाला पाहिजे, अर्धवट फोडली टेकडी, चुकीच्या दिशा दर्शक फलक यामुळे नागरिक हैराण झाले आहे.

चांदणी चौक प्रकल्प सल्लागार भारत तोडकरी म्हणाले की, एका अंडरपासचे काम राहिले आहे. ते दोन महिन्यात होणे अपेक्षित आहे. तो झाल्यावर दुहेरी मार्ग होईल. नागरिकांच्या काही तक्रारी महानगरपालिकेशी निगडीत आहे. त्याचे निराकरण महानगरपालिकाच करु शकेल.

  • एनएचएआयच्या सेवा रस्त्यावर आणि लगतच्या रस्त्त्यावर गती रोधक बसवावे

  • एनएचएआयच्या सेवा रस्त्यावर पदपथाची सोय करावी.

  • योग्य वाहतूक सुचना फलक लावावेत.

  • दुहेरी वाहतुक करावी.

  • अर्धवट तोडलेली टेकडी पुर्ण पाडून स्लिप रोड वारजे पर्यंत पुर्ण करावा.

  • अर्धवट तोडलेल्या टेकडी पासून आत येणारा एक्झिट बंद करुन ती वाहतूक ओएसिस हॉटटेल पासून आत वळवावी.

मूक महामोर्चामध्ये सहभागी सोसायटी

वेद भवन मंदिर, वेद विहार सोसायटी, रविराज रेसिडेन्सी, हेरंब रेसिडेन्सी, मनोहर रेसिडेन्सी-१, विश्वजीत अपार्टमेंट, साई प्रसाद अपार्टमेंट, सुयश अपार्टमेंट, सिध्दार्थ पार्क-ए, मनोहर रेसिडेन्सी-२, सिध्दार्थ पार्क-बी, श्रीरंग अपार्टमेंट, गौरांग अपार्टमेंट, वेदांत सोसायटी, सिध्दार्थ पार्क-सी, श्री समर्थ अपार्टमेंट, निर्माण निसर्ग अपार्टमेंट, सद्योजत अपार्टमेंट, वेदश्री, श्री राज व्हीला, रूणवाल साधना, श्रीशा एनक्लेव्ह, ओम रेसिडेन्सी को-ऑप. सोसायटी, श्री भारती तीर्थ कृपा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT