पुणे

लेटरहेडचा गैरवापर केल्याने सीमकार्ड वितरकाला अटक 

सकाळ वृत्तसेवा

पुणे -  नवीन पोस्टपेड कनेक्‍शन घेण्यासाठी आयडियाच्या वितरकाने कुरिअर कंपनीच्या लेटरहेडचा गैरवापर  करून 491 नवीन सीमकार्ड सुरू केली. प्रत्येक कनेक्‍शनमागे त्याने 800 रुपयांचे कमिशन उकळल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले. या वितरकाला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. 

चंदन गुप्ता (रा. भोसरी) असे अटक केलेल्या वितरकाचे नाव आहे. गुप्ता हा "मे गेटवे कंपनी'चा मालक आहे. ट्रॅकॉन कुरिअर कंपनीने फेब्रुवारी 2018मध्ये आयडियाचे नवीन पोस्टपेड कनेक्‍शन घेण्यासाठी चौकशी केली होती. त्या वेळी गुप्ता याने ट्रॅकॉनला 34 नवे सीमकार्ड सुरू करून दिली. त्यातील 20 कार्ड सुरू असून, 14 कार्ड मे महिन्यात बंद करण्यात आली. 

त्यानंतर गुप्ता याने ट्रॅकॉन कंपनीच्या लेटरहेडचा गैरवापर करून 491 सीमकार्ड घेतली. यामुळे कुरिअर कंपनीला दोन लाख 14 हजार रुपयांचे बिल आले. यामध्ये काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीने याविरोधात फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हा प्रकार समोर आला. पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राधिका फडके यांच्या पथकाने हा तपास केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

Water On Moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाण्याचे साठे.... इस्त्रोने केला मोठा खुलासा

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आसामच्या काही भागांमध्ये पूर

SCROLL FOR NEXT