पुणे

जिल्ह्यातील ५ हजार ७०० हेक्टर क्षेत्राची पंचनामे पुर्ण,४५ हजार ४५७ हेक्टरचे पंचनामे शिल्लक,

CD

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५७००
हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

दहा ऑक्टोबरची मुदत, प्रशासनासमोर मोठे आव्हान

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात ५१ हजार १५७ हेक्टर क्षेत्र पिकाखाली असून, आतापर्यंत केवळ ५ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ४५ हजार ४५७ हेक्टरवरील पंचनामे मुदतीत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्गातील आठ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात भात, नाचणी आणि भुईमूग पिकांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात येत आहेत.
गेल्या सहा-सात दिवसांपासून जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. गावागावांतील ग्रामपंचायत क्षेत्रांत हे काम सुरू आहे. येत्या १० ऑक्टोबरपूर्वी नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जाहीर केलेल्या मुदतीनुसार आता केवळ तीन दिवस शिल्लक आहेत.
जिल्ह्यात ५१ हजार १५७ हेक्टर क्षेत्र पीक लागवडीखाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ५ हजार ७०० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित ४५ हजार ४५७ हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला गती वाढवावी लागणार आहे.

कोट ---
जिल्ह्यात ५१ हजार १८५ हेक्टर क्षेत्र शेती पिकाखाली असून, नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. सर्वाधिक नुकसान कुडाळ तालुक्यात १२ हजार हेक्टर क्षेत्राला बसले आहे. जिल्ह्यातील ९५ हजार ५६३ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
- तुकाराम साईल, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'I Love Karad' आयलँडसमोरील वाहतूक बदल भोवला; कोल्हापूर नाक्यावरील मार्ग बदलल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, प्रशासनाचा ढिसाळ कारभार

Sant Balumama Temple Land Scam : आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्ट जमीन गैरव्यवहारात अतिग्रेच्या माजी सरपंचाला अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

टीम इंडियाचे 'Fantastic Four'! आयसीसीची मोठी घोषणा, जगात भारताच्या ८ खेळाडूंचा डंका

Latest Marathi News Live Update : विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधी पक्षाच्या खासदारांसोबतच्या स्नेहभोजनास उपस्थित

अनेकांनी पैसे बुडवले, पत्नीमुळे तरला! 'हे' काम करते 'दृश्यम ३'मधल्या गायतोंडेची बायको; दिसायलाही आहे इतकी सुंदर

SCROLL FOR NEXT