पुणे

फार्मर आयडी अभावी शेतकरी महिला,शेतकऱ्यांचे वारस कर्जमुक्तीपासुन वचिंत,

CD

सिंधुदुर्गात ‘फार्मर आयडी’मुळे
‘कर्जमुक्ती’पासून अनेक वंचित

एकनाथ पवार : ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी : फार्मर आयडी नोंदणी होत नसलेल्या शेतकरी महिला, शेती करणारे शेतकऱ्यांचे वारस, देवस्थान जमिनी कसणारे शेतकरी हे सर्व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहिले आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील २,७५८ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमुक्तीचे १४.४० कोटी रुपये जमा झाले आहेत. अजूनही विविध कारणांमुळे १ हजार ५५६ ई-केवायसी प्रलंबित असून १ हजार ६२ शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही.

जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या ६ हजार ३७० पैकी ५ हजार ३९७ शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरली होती. यामध्ये विकास आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील ३ हजार ४७४ कर्जदार शेतकरी, राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकेकडील १ हजार ९२३ शेतकऱ्यांचा समावेश होता. या शेतकऱ्यांपैकी अजूनही १ हजार ५५६ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे. तर १०६२ शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्याचे समोर आले आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार विकास व जिल्हा बँकेच्या २ हजार १२७ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत ८ कोटी ८४ लाख ७९ हजार ९०४ रुपये जमा झाले आहेत. राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांच्या ६३१ शेतकऱ्यांना ५ कोटी ५६ लाख १३ हजार ८५९ रुपयांचा लाभ मिळाला आहे.

कर्जमुक्तीच्या रकमेचे वितरण टप्प्याटप्प्याने करण्यात आले आहे. ७ ऑगस्टला १ हजार ५६९ शेतकऱ्यांच्या खात्यांत ७ कोटी ७७ लाख ९८ हजार ७४४ रुपये जमा झाले. त्यानंतर २४ ऑगस्टला ९२९ शेतकऱ्यांना ५ कोटी ५० लाख ७१ हजार १२८ रुपये देण्यात आले. १ ऑक्टोबरला आणखी २६० शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत १ कोटी १२ लाख २३ हजार ८९१ रुपये जमा झाले. एकूण २ हजार ७५८ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे.
कर्जमुक्ती योजनेतर्गंत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना लाभ मिळाला असला तरी ई-केवायसी आणि फार्मर आयडीअभावी अनेक शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहीले आहे.१०६२ शेतकऱ्यांचा प्रश्न क्लिष्ट आहे.या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडीच नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये महिला शेतकरी, शेतीकरिता समंतीपत्राचे आधारे कर्ज घेणारे शेतकऱ्यांचे वारसांचा समावेश आहे. याशिवाय देवस्थान इनाम, कबुलायतदार गावकर जमीन कसणारे शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. सातबारात नाव समाविष्ट नसल्याने या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नोंदणी होत नाही. त्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले आहेत.
चौकट :
कर्जमुक्तीची सद्यःस्थिती
* एकूण पात्र शेतकरी - ५ हजार ३९७
* रक्कम जमा झालेले शेतकरी-२,७५८
* एकूण वितरित रक्कम-१४.४०
* ई - केवायसी पुर्ण झालेले शेतकरी-३,२६०
* केवायसी प्रलबिंत शेतकरी-१,५५६
* फार्मर आयडी नसलेले शेतकरी-१,०६२

--- कोट -----
कर्जमुक्ती यादीत माझा समावेश आहे. रक्कम ३० हजार ४७० इतकी आहे. आधारलिंक केले आहे, परंतु अजूनही मी कर्जमुक्त झालेलो नाही.
- रामा धोंडू गवाणकर, शेतकरी, लोरे, ता.वैभववाडी, जि.सिंधुदुर्ग

--- चौकट ----
इनामी जमीन कसणारे दूरच..
देवस्थान इनाम जमीनी कसणारे शेतकरी, महिला शेतकरी, कुटुंब प्रमुखाच्या संमतिपत्राच्या आधारे बँकेकडून कर्ज घेऊन शेती करणारे शेतकरी, तोंडी कराराने शेती करणारे लहान शेतकरी हे शेतकरी केवळ फार्मर आयडी नसल्याने कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहणार आहेत. यासंदर्भात पालकमंत्री नीतेश राणेंच्या माध्यमातुन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यांच्याकडे फार्मर आयडी सक्तीचा न करण्याची विनंती करण्यात आली आहे,अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा मनीषा दळवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कनॉट प्लेसमधील दुकानं भाजपानं जबरदस्तीनं बंद केली; राहुल गांधींचा भाजपवर गंभीर आरोप; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची 'महारॅली'

IND vs NZ, 5th T20I: सिफर्टच्या ९३ धावा अन् फिलिप्सने मोडला विलियम्सनचा रेकॉर्ड; न्यूझीलंडने मॅच जिंकली, पण मालिका भारताच्या खिशात

मतांसाठी उमेदवारांची भन्नाट ऑफर! कुठे २,५०० रुपये, तर कुठे चक्क एक किलो चिकन फ्री; मतदानाच्या दिवशी लोकशाहीचे धिंडवडे!

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात, कोरडे पडतात? पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम; ओठ राहतील मऊ!

Latest Marathi News Update : रावेरच्या चार भावंडांच्या हत्येचा तपास; IPS कुमार चिंता यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

SCROLL FOR NEXT