पुणे

आडारी माळरानाला वणवा,आंबा,काजुची उत्पादनक्षम झाडे जळाली,लाखो रूपयांची हानी,

CD

--- फोटो A01428 ---

आडारी माळरानाला वणवा
आंबा, काजूची झाडे जळाली, लाखोंची हानी

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील आडारी (ता.मालवण) माळरानाला शनिवारी (ता.१६) दुपारी आग लागली. या आगीत आडारी, खेंदा आणि न्हिवे परिसरातील आंबा, काजूची शेकडो उत्पादनक्षम जळून लाखो रुपयांची हानी झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

जिल्ह्यात साधारणपणे नोव्हेंबर अखेरीपासून मे महिन्यापर्यंत वणवे लागण्याचे प्रकार घडतात. मात्र, यावर्षी हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच जिल्ह्यातील आडारी माळरानाला शनिवारी दुपारी आग लागली. कडक उन्हामुळे आगीचा भडका उडाला. आग लागल्याचे समजताच बागायतदारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग विझविण्याचा आटोका प्रयत्न केला परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. अखेर मालवण नगरपरिषदेचा अग्निशमन बंब बोलविण्यात आला. अग्निशमन दलाने दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश आले. स्थानिक ग्रामस्थांनी देखील आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत परिसरात दहा ते बारा आंबा,काजु उत्पादकांच्या आंबा, काजू बागांतील झाडांचे नुकसान झाले आहे. सध्या आंबा आणि काजू कलमांना पालवी फुटण्याची प्रकिया सुरू झाली आहे. काही ठिकाणी मोहोर देखील आला आहे. आगीमुळे त्याचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले होते. तलाठ्यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली असून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे.
फोटो ओळी- जिल्हयातील आडारी ता.मालवण परिसरातील माळरानाला आग लागली.ही आग मालवण नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाद्वारे विझविण्याचा प्रयत्न सुरू होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahanadi Coalfields IPO: Jio नंतर आता सरकारी कंपनीचा IPO करू शकतो मालामाल! GMP किती, एका लॉटसाठी किती पैसे लागणार?

IND vs NZ: पहिल्या कसोटीत कोण IN अन् कोण OUT? शुभमन गिलच्या Playing XI मध्ये बुमराह, पंत, जुरेल कोणाला संधी? कशी असेल भारताची Playing XI

Latest Marathi News Update : राज्यात दुष्काळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर दोन राज्यातील मेंढपाळांमध्ये मोठा तणाव

"ही दोस्ती तुटायची नाय" सुमीत राघवनने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत धरला ठेका, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Earthshot Prize 2026: पृथ्वी वाचवण्यासाठी प्रिन्स विल्यम यांचा खास उपक्रम! काय आहे अर्थशॉट प्राइज?

SCROLL FOR NEXT