सिंधुदुर्गात चौदा ग्रामपंचायतींच्या
पोटनिवडणुकीसाठी मतदान
ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२८) शांततेत मतदान प्रकियेला सुरुवात झाली आहे. पाच थेट सरपंचपद आणि अन्य ठिकाणी सदस्याकरीता ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी १४ हजार २१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निधन आणि इतर कारणांमुळे रिक्त झालेल्या थेट सरपंच आ. सदस्य पदाकरीता प्रशासनाने निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. १४ ग्रामपंचायतीपैकी पाच ठिकाणी थेट सरपंच पदाकरीता अन्य नऊ ठिकाणी सदस्यांकरिता ही निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडुन सोमवारी दुपारीच निवडणूक अधिकारी, कर्मचारी रवाना करण्यात आले. कणकवली तालुक्यातील घोणसरी, मालवण तालुक्यातील सुकळवाड, चौके, कुडाळ तालुक्यातील कालेली आणि सावंतवाडी तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाकरीता थेट निवडणुक होत आहे. या सर्व ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासुन मतदान प्रकियेला सुरुवात झाली. तर कणकवली तालुक्यातील दारिस्ते, तळेरे, मालवण तालुक्यातील धामापुर, वराड, कुडाळ तालुक्यातील गावराई,चेंदवण, रानबांबुळी, वेंगुर्ल्यातील मठ, सावंतवाडी नाणोस या ठिकाणी सदस्य पदाकरीता मतदान शांततेत सुरू आहे.
थेट सरपंच पदाच्या निवडणुकीकरीता मंगळवारी सकाळपासूनच चुरशीने मतदान सुरू आहे.कडक ऊन असल्यामुळे सकाळच्या सत्रात अधिकाधिक मतदान व्हावे याकरीता राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आग्रही आहेत.कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन सर्व मतदान केंद्रांबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.