पुणे

सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम,अनेक भागात पडझडीचे प्रकार,शेती कामाला गती,

CD

सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम

अनेक भागात पडझडीचे प्रकार, शेती कामाला गती

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी ः सिंधुदुर्गात पावसाचा जोर कायम असून, मंगळवारी रात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. बुधवार (ता.२४) सकाळपासून देखील पावसाच्या सरीवर सरी सुरू आहेत. पावसामुळे काही भागांत पडझडीचे प्रकार झाले आहेत.काही भागात वीजपुरवठा देखील खंडीत आहे. जिल्ह्यात शेतीकामांना वेग आला आहे.
जिल्ह्यात सोमवारी (ता.२२) रात्री आणि मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाल्यानतंर रात्री देखील पावसाच्या सरीवर सरी सुरू होत्या. या पावसामुळे सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांच्या काही भागात झाडे वीजवाहिन्यांवर उन्मळून पडली. त्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला.काही ठिकाणी वाहतुक देखील विस्कळीत झाली. जिल्ह्यातील वैभववाडी, सावंतवाडी, कणकवली, दोडामार्ग तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला, तर अन्य तालुक्यात देखील पावसाचा जोर आहे. या पावसामुळे आतापर्यंत कोरडे पडलेले नदीनाले प्रवाहीत झाले आहेत. शेतीकामांना देखील वेग आला आहे. रखडलेल्या नांगरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

सिंधुदुर्गात दोन आँरेज अलर्ट
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने २५ आणि २६ रोजी आँरेज अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज दिला असून, ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता देखील आहे.

तालुकानिहाय पाऊस (मिमी)
देवगड २७, मालवण ४४, सावंतवाडी ६७, वेंगुर्ला ५१ , कणकवली ८२, कुडाळ ६०, वैभववाडी ८५, दोडामार्ग ७३,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: सुवर्णपदकाची हॅट्रीक थोडक्यात हुकली, तजिंदरपाल सिंग तूरने जिंकलं रौप्य; भारत मेडल्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

समृद्धीवर कारची कंटेनरला धडक, आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू; पुण्याहून जालन्याला जाताना अपघात

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT