Pune film stars Voting  esakal
पुणे

Lok Sabha Election 2024 :आपण जर पाच वर्ष सरकारला जाब विचारत असू तर.. कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Voting : कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळ डिजिटल टीम

Pune : मावळ लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी (ता.१३) मतदान पार पडले. यावेळी शहरात मतदान असणाऱ्या कलाकारांनी आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. सौरभ गोखले यांनी अजमेरा कॉलनी येथे मतदान केले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने निगडीतील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये, तर पुष्कराज चिरपुटकर याने यमुनानगर येथील शिवभूमी विद्यालय येथे मतदानाचा हक्क बजावला.

‘केंद्र सरकारमध्ये कोण असावे यासाठी हे मतदान आपण करत आहोत. त्यामुळे स्थानिक पातळीवर कोण आहे हा विचार न करता देशाचा विचार करून मतदान करा.मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्वांनी तो बजवावा असा माझा आग्रह आहे ’

सौरभ गोखले , अभिनेता

‘ प्रशासनाने मतदानासाठी अगदी चांगली सोय केलेली आहे. सर्वांना सुटीही दिलेली आहे. मतदान करणे ही अगदी साधी सोपी प्रक्रिया आहे. आपल्‍या चांगल्या भविष्यासाठी त्यामुळे प्रत्येकाने मतदान हे केलेच पाहिजे. '

- पुष्कराज चिरपुटकर, अभिनेता

‘ आपण जर पाच वर्ष सरकारला जाब विचारत असू तर आपण मतदान केले पाहिजे. कर्नाटकमध्ये शूट करत होते. येथून मी खास मतदानासाठी पिंपरी चिंचवडला आलो आहे. नेता निवडण्याची संधी आपल्याला मिळत आहे ती गमावली नाही पाहिजे. भारत देश घडवायचा असेल तर चांगल्या व्यक्तींना निवडून दिले पाहिजे. तर आपल्याला पुढे जाऊन चांगल्या सोयी सुविधा मिळतील.’

- डॉ उत्कर्ष शिंदे, गायक व अभिनेता

‘अपेक्षा घेऊनच आपण मतदानासाठी बाहेर पडतो. आजचाच दिवस आहे जेव्हा आपल्याला महत्त्व असते. हा महत्त्वाचा दिवस जर आपण वाया घालवला तर पुढील पाच वर्षे आपल्याला काहीच बोलण्याचा अधिकार राहणार नाही. राजकारणावर अनेकजण घरात बसून डिबेट करतात. मात्र जोपर्यंत आपले कर्तव्य बजावत नाही तोपर्यंत याला काही अर्थ नाही. मतदानातून बदल घडेल ही अपेक्षा

- सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT