shrikant patil pune
पुणे

सिंघम अधिकारी श्रीकांत पाटील यांची इंदापुरात बदली

इंदापूरला पुन्हा येण्यामुळे निरा व भीमा खोऱ्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी देव पाण्यात घातले आहेत.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : तालुक्यातील अवैध गौण खनिज व वाळू उपसा यास चाप बसवलेले सिंघम अधिकारी श्रीकांत पाटील यांची दि. ६ ऑगस्ट रोजी सोलापूर हुन इंदापूरला तहसीलदार म्हणून पुन्हा बदली झाली असून ते ९ ऑगस्ट रोजी इंदापूर तहसिल कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत. मात्र त्यांच्या इंदापूरला पुन्हा येण्यामुळे निरा व भीमा खोऱ्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांनी देव पाण्यात घातले आहेत. (Pune News)

इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरीयांच्या प्रस्तावित बदलीमुळे रिक्त जागेवर श्रीकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या इंदापूरचा पदभार प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याकडे असूनसोनालीमेटकरी यांना पुणे नगरपालिका प्रशासन शाखा विभागीय आयुक्त कार्यालयात तहसीलदार पदाचा पदभार देण्यात आला आहे.

चार वर्षांपूर्वी श्रीकांत पाटीलयांनीतालुक्याच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अभ्यास करून कायद्याचा वचक दाखवत अवैद्य धंद्यांचा बीमोड केला होता. त्यामुळे अवैध वाळू उपसा तसेच गौण खनिज उत्खनन पूर्णपणे थांबले होते. वेळप्रसंगी उजनी पाणलोट क्षेत्रात स्वतःचा जीव धोक्यात घालून श्रीकांत पाटील यांनी जिलेटीनच्या सहाय्याने भीमानदी पात्रात उतरून बोटी उडवून दिल्या होत्या. युवा पिढीस स्पर्धा परीक्षेसंदर्भात त्यांनीमोफत मार्गदर्शन केले होते तर महापुरुष व महान महिलांचा जयंती उत्सव कसा साजराकरायचा याचा वस्तुपाठ त्यांनी दिला होता.

प्रशासनात पारदर्शी कारभारामुळे त्यांनी जनतेच्या मनात चांगले स्थान निर्माण केले होते. त्यामुळे इंदापूरहुन त्यांची बदली झाल्यानंतर अनेकांना अश्रू अनावर झाले होते. आता ते पुन्हा इंदापूरला येणार असल्याने लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र तालुक्यात विविध संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या असल्याने ते पुन्हा आपली सिंगमगिरी दाखवणार का याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT