Singnal Synchronizing  only on Paper
Singnal Synchronizing only on Paper 
पुणे

'सिग्नल सिंक्रोनायझिंग' कागदावरच ! ; केबलचे काम प्रलंबित

पांडुरंग सरोदे

पुणे : पुणेकर वाहतूक कोंडीच्या समस्येने ग्रस्त असताना, दुसरीकडे वाहतूक सुरळीत आणि जलद गतीने सुरू ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली "सिग्नल सिंक्रोनायझिंग' व्यवस्था अनेक वर्षांपासून कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. "सिग्नल सिंक्रोनायझिंग'साठी आवश्‍यक केबल टाकण्याचे कामही अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे पुणेकरांना आणखी काही वर्षे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. 

संततधार पाऊस, रस्त्यांना पडलेले खड्डे, शहरात विविध ठिकाणी सुरू असलेले मेट्रोसह विविध विकासकामे, धरणातील विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील रस्ता बंद असणे, पीएमपीएलच्या सातत्याने बंद पडणाऱ्या बस आणि बेशिस्त वाहनचालक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे मागील पंधरा दिवसांपासून शहरातील वाहतूक समस्या गंभीर बनली आहे.

घरापासून कार्यालयापर्यंत पोचण्यासाठी नागरिकांचे एक ते दोन तास वाया जात असल्याची सद्यःस्थिती आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत व जलदगतीने होण्यासाठी "सिग्नल सिंक्रोनायझिंग' व्यवस्था असणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील काही रस्त्यांवर "सिग्नल सिंक्रोनाईज्ड' करण्यात आले होते. मात्र सध्या एक-दोन रस्त्यांचे अपवाद वगळता "सिग्नल सिंक्रोनायझिंग' व्यवस्था उपलब्ध नाही. 

टिळक रस्त्यावर नऊ, तर शिवाजी रस्त्यावर अकरा सिग्नल आहेत. कमी अंतरावर सिग्नल असल्याने ते एकापाठोपाठ एक मिळावेत, अशी वाहनचालकांची अपेक्षा असते. प्रत्यक्षात तसे घडत नाही. त्यामुळे वाहनचालक पुढे निघण्यासाठी घाई करतात. परिणामी, वाहतूक कोंडीमध्ये भर पडत असल्याचे चित्र आहे. 

वाहतूक शाखेचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मनोज पाटील यांनी "सिग्नल सिंक्रोनायझिंग'ची गरज व्यक्त केली होती. त्यानुसार महापालिकेने सेनापती बापट रस्ता, गुंजन चित्रपटगृह ते जहॉंगीर रुग्णालय, कर्वे रस्त्यावरील खंडुजीबाबा चौक ते नळस्टॉप अशा काही रस्त्यांवर सिंक्रोनाईज्डचे काम केले. त्यानंतर आणखी सात रस्त्यांवर त्याचे काम करण्यास सुरवात केली. प्रत्यक्षात मात्र हे काम पूर्णत्वास गेले नाही. 

काय आहे "सिग्नल सिंक्रोनायझिंग' 

दोन चौकांमधील दोन्ही सिग्नल केबलने जोडून त्यांच्या वेळा जुळविल्यास एका सिग्नल पाठोपाठ दुसरा सिग्नल सुटतो. त्यामुळे वाहतुक सुरळीत होण्याबरोबरच त्यास गती मिळते. लागोपाठ सिग्नल असलेल्या रस्त्यांवर ही व्यवस्था कार्यान्वित होऊ शकते. त्यामुळे पोलिसांवरील ताणही कमी होतो. शहरांतील सर्व प्रमुख रस्त्यांवर सिंक्रोनाईज्ड सिग्नल असणे आवश्‍यक आहे. 

सिंक्रोनायझिंगला येणाऱ्या अडचणी 

शहरात सर्वत्र वेगवेगळ्या कंपन्यांचे सिग्नल आहेत. बहुतांश सिग्नलचे प्रकारही वेगळे आहेत. स्थानिक पातळीवरील गरजेनुसार संबंधित सिग्नलची रचना केली आहे. या सगळ्या कारणांमुळे सिग्नल सिंक्रोनायझिंग करणे अडचणीचे ठरत आहे. 

सध्या शहरात स्थानिक पातळीवरील गरजेनुसार काही सिग्नलचे सिंक्रोनायझिंग केले आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे सिग्नलचे सिंक्रोनायझिंग झालेले नाही. मात्र वाहतुकीचा ताण पाहून वेळ व गरजेनुसार हाताने पथदिव्यांचे नियंत्रण करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होईल. 
- तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा 

* शहरातील सिग्नलची संख्या - 388 
* पोर्टेबल (बॅटरी) सिग्नल - 5 
* कायमस्वरूपी बंद असलेले सिग्नल - 24 

वाहतुकीबाबत 15 दिवसांत 200 तक्रारी 

पोलिसांनी व्हॉटस्‌ऍप क्रमांकावरून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये दोनशेहून अधिक तक्रारी वाहतुकीबाबत होत्या, तर वैयक्तिक 122, ध्वनिप्रदूषण 34 व अवैध धंद्यांबाबत 21 तक्रारी आल्या आहेत. वाहतुकीच्या तक्रारींमध्ये वाहतूक कोंडी, दंडआकारणी, रस्त्यावरील खड्डे, बंद सिग्नल या संदर्भात आहेत. 

* वाहतुकीच्या तक्रारींसाठी नवीन क्रमांक - 8411800100

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT