pune sakal
पुणे

सिंहगडावरील हत्तीटाक्यात बुडून सहलीला आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

स्थानिकांनी काढला मृतदेह बाहेर

निलेश बोरुडे

सिंहगड: सिंहगडावरील हत्ती टाक्यात सहलीसाठी आलेला इयत्ता बारावीचा विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाहिद मुल्ला असे विद्यार्थ्याचे नाव असून तो मुळशी येथील प्रियदर्शनी स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकत होता. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेत दुर्दैवाने संबंधित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सिंहगडावरील रहिवासी व व्यावसायिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत शाहिदला पाण्यातून बाहेर काढले.

मुळशी येथील प्रियदर्शनी स्कूलचे इयत्ता बारावीचे साठ विद्यार्थी व चार शिक्षक सिंहगडावर सहलीसाठी आले होते. देवटाके व लागूनच असलेल्या हत्ती टाके परिसरात असताना शाहिद मुल्ला या विद्यार्थ्याचा शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरला व तो थेट हत्तीटाक्याच्या पाण्यामध्ये पडला. अमोल पढेर,विठ्ठल पढेर,आकाश बांदल,विकास जोरकर, ओंकार पढेर,सूरज शिवतारे,पवन जोरकर, सुग्रीव डिंबळे, तुषार डिंबळे, शिवाजी चव्हाण, रामदास बांदल, राजू सोनार व इतर हॉटेल व्यावसायिकांनी ताबडतोब पाण्यामध्ये उड्या घेऊन शाहिद चा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून येत नव्हता. अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्थानिकांनी शाहिद मुल्ला यास पाण्यातून बाहेर काढले.

जोरदार पाऊस सुरू असल्याने देवटाके पूर्ण भरलेले आहे, त्यामुळे शाहिदचा शोध लागण्यास उशीर झाला. त्यामुळे या दुर्दैवी घटनेत शाहिद मुल्ला या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आहे. विद्यार्थ्यांसोबत आलेले शिक्षक व विद्यार्थी आकस्मिकपणे घडलेल्या या प्रकारामुळे घाबरून गेले होते. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नांदेड सिटी अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती देण्यात आली होती परंतु अग्निशमन दल घटनास्थळी येण्याच्या अगोदर स्थानिकांनी मृतदेह बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलीस ठाण्याकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

अभिनेत्री रकुलप्रीत सिंगच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी; चित्रपटांच्या नावाखाली परदेशात पैसा पाठवत असल्याचा संशय

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Latest Marathi News Live Update : पाण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांचा रास्ता रोको.. पाण्यासाठी मेंढ्याही रस्त्यावर

SCROLL FOR NEXT