Sinhagad Fort Pune Sakal
पुणे

Sinhagad Fort Pune : परत आली यशवंती घोरपडीची आठवण! सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी; Video Viral

दत्ता लवांडे

पुणे : पुणे शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सिंहगड किल्ल्यावर काल रविवारी पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. तर गडावर जाणाऱ्या पर्यटकांची रस्त्यावर गर्दी झाली असून बराच वेळ पर्यटक अडकून पडल्याची माहिती आहे.

पर्यटकांची ही गर्दी बघून यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने कडा चढून तानाजी मालुसरे यांनी सर केलेल्या किल्ल्याच्या जुन्या आठवणी यानिमित्ताने पुन्हा जाग्या झाल्या आहेत. या गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, पुणे शहरातील नागरिक आणि ग्रामीण भागातील नागरिक रविवार या सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. त्याचबरोबर मान्सूनच्या सीझनमध्ये निसर्गानुभव, पाऊस, धबधबे आणि निसर्गाची किमया पाहण्यासाठी पर्यटक आतुर असतात. पण सध्या गडकिल्ल्यांना पर्यटकांची पसंती असून जास्त पर्यटकांनी हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी गर्दी झाली आहे.

सिंहगड किल्ल्यावरील पुणे दरवाजा जवळील एक व्हिडिओ समोर आला असून तिथे पर्यटक अडकून पडले असून रांगेत उभे असल्याचं दिसत आहेत. गर्दीमुळे बऱ्याच वेळ पर्यटकांना एकाच जागी थांबावं लागलं असून मोठा त्रास सहन करावा लागला आहे. तर पर्यटकांनी फिरायला जात असताना काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Cancellation: कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे सरकारचा मोठा कट, बदला घेतल्याशिवाय राहणार नाही; मनोज जरांगे यांचा थेट इशारा

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

Uttarakhand Travel: Uttarakhand 'व्हॅली ऑफ फ्लॉवर्स' ट्रेकिंगसाठी खुली; ब्रिटिश पर्वतारोहकांनी कसा लावला होता 'हिमालयीन नंदनवनाचा' शोध?

Meerut Viral Video: मेरठमध्ये कांवडियांनी पोलिसांना मारहाण केली? व्हायरल व्हिडिओमागचं खरं सत्य समोर

काळीज चिरणारा Video: मॅच सुरू असताना वीज कोसळली अन् २४ वर्षीय खेळाडूचा जागीच मृत्यू...

SCROLL FOR NEXT