पुणे

वडगाव, धायरी परिसरात रात्री उशिरापर्यंत बार, हाॅटेल्समुळे उपद्रव; हल्ले, गुन्हेगारी अन् अपघातांमुळे नागरिक भयभीत...

शहरातील कल्याणी नगर येथे घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह च्या घटनेनंतर रात्री अपरात्री सुरू असणाऱ्या पब, वाईन शॉप, बियर शॉपी यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

विठ्ठल तांबे

धायरी : शहरातील कल्याणी नगर येथे घडलेल्या ड्रंक अँड ड्राईव्ह च्या घटनेनंतर रात्री अपरात्री सुरू असणाऱ्या पब, वाईन शॉप, बियर शॉपी यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सिंहगड रोड परिसरात देखील रात्री उशिरापर्यंत बार, रेस्टॉरंट, वाईन, बिअर शॉपी, अंडा भुर्जीच्या गाड्या, पानटपऱ्या सुरू असतात. त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तरुणांचे टोळके धिंगाणा घालत असतात.

रात्रीच्या वेळी वर्दळ कमी झालेल्या रस्त्यावर बेदरकार, प्रचंड वेगाने वाहने चालवणे, रात्री फटाके फोडून वाढदिवस साजरा करणे, मोठ्या आवाजात ओरडणे, शिव्या देणे, वाहनांची मोडतोड नुकसान करणे असे प्रकार घडत आहेत.

कल्याणी नगर सारखा दुर्दैवी प्रकार सिंहगड रोड परिसरातील घडू नये यासाठी शासनाने निर्धारित केलेल्या वेळेवर सर्व बार, रेस्टॉरंट, वाईन, बिअर शॉपी व  खाऊ गल्लीमधील स्टॉल वडापाव भुर्जीच्या गाड्या, पानटपऱ्या बंद होतील याबाबतची खबरदारी घेतली जावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी पुणे शहरातील नव शैक्षणिक हब म्हणून सिंहगड रस्ता नावलौकिक पावत आहे. देश विदेशातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. परंतु रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या धांगडधिंग्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्याला मी निवेदन दिले आहे.

परिसरात वाढती गुन्हेगारी, अपघात या मुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच उशीरा पर्यत चालणारे बार, बियर शॉपी तसेच इतर व्यवसाय यामुळे टुकार गॅंग किंवा गुन्हेगारांची टोळकी रस्त्याने फिरत असतात.गुन्हेगार प्रवृत्तीचे मुले ट्रिपल सीट बसून शिव्या, वेडेवाकडे आवाज करत, हॉर्न वाजवत गावातील अंतर्गत रस्त्यावर फिरतात..

- राजेश बोबडे, नागरिक

पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व आस्थापना नियमाप्रमाणे साडेअकरा वाजता आणि ज्या आस्थापनांना दीड वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्याप्रमाणे बीट मार्शल व संबंधित नाईट राउंडचे अधिकारी वेळेत बंद करून घेतात. एखादी आस्थापना पोलिसांचा राऊंड झाल्यानंतर उघडेत असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल .

-विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता पोलीस स्टेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT