sh.jpg 
पुणे

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील महत्वाची बातमी; वाचा सविस्तर

निलेश बोरुडे

किरकटवाडी : कित्येक दिवसांपासून काम रखडलेल्या सिंहगड रस्त्याची गोऱ्हे बुद्रुक ते डोणजे फाट्या दरम्यान अक्षरशः चाळण झाल्याचे चित्र आहे.त्यामुळे नवीन रस्ता तर नाहीच किमान खड्डे तरी बुजवावेत अशी  मागणी या भागातील नागरिक करत आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

सध्या पावसाचे दिवस असल्याने रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे‌‌. खड्ड्यांमध्ये पाणी असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही परिणामी दुचाकी चालकांचे अनेक अपघात या खड्ड्यांमुळे झालेले आहेत. चार चाकी वाहन चालकांनाही खड्डे चुकवताना मोठी कसरत करावी लागत आहे.

 गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मालखेड, घेरा सिंहगड, वरदाडे, आंबी, सोनापूर यांसह वेल्हे तालुक्यातील पानशेत सह अनेक गावांसाठी दळणवळणासाठी एकमेव सिंहगड रस्त्याचा आधार आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडल्यामुळे नागरिकांसह पर्यटकांचीही गैरसोय होत आहे. नांदेड फाट्यापासून किरकटवाडी फाट्यापर्यंतही या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. रस्ता पूर्ण होत नाही परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून किमान खड्डे तरी बुजवून घ्यावेत अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत.

 "प्रशासनाने किमान खड्डे तरी बुजवावेत. खराब रस्त्यामुळे वाहनांचे तर नुकसान होत आहेच शिवाय नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झालेला आहे. डी आय.ए.टी. ते गोऱ्हे बुद्रुक दरम्यान रखडलेले कामही तातडीने सुरू करण्यात यावे.-राम खिरिड, नागरिक, गोऱ्हे बुद्रुक.

सिंहगड रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ सुरू करण्यासंदर्भात ठेकेदाराला बजावले आहे. जवळपास 20 किलोमीटरचे अंतर वन हद्दीतून जात असल्याने त्यासंदर्भात वन विभागाकडून परवानगी मिळण्यात अडचणी येत होत्या. ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत तेथील खड्डे बुजवून घेण्यास ठेकेदाराला सांगण्यात आलेले आहे. स्वतः उभं राहून काही ठिकाणचे खड्डे बुजवून घेतले आहेत.-ज्ञानेश्वर राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग शाखा अभियंता

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT