anuja patil and akanksha pawar sakal
पुणे

Pune News : सिंहगडच्या अनुजा पाटील आणि आकांक्षा पवार राष्ट्रीय पारितोषिक

जागतिक स्तरावरील झेप संघटनेने जागतिक डिजिटल डीटाॅक्स दिवसानिमित्त 'डिजिटल डीटाॅक्स काळाची गरज या स्वरूपात स्पर्धा आयोजित केली होती.

संजय हेगडे

तिसंगी - झेप संघटना द्वारे जागतिक डिजिटल डीटाॅक्स दिवसाचे औचित्य साधून 'तंत्रज्ञान, मोबाईल आणि इंटरनेट" यांचे मनावर होणारे फायदे आणि दुष्परिणाम या विषयावर ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एस. के. एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कुमारी अनुजा पाटील हिने द्वितीय तर कुमारी आकांक्षा पवार हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

जागतिक स्तरावरील झेप संघटनेने जागतिक डिजिटल डीटाॅक्स दिवसानिमित्त 'डिजिटल डीटाॅक्स काळाची गरज या स्वरूपात स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत स्पर्धकांनी स्वतःचे विचार नाटक, कविता, भारूड, प्रार्थना आदी विषयांवर विचार व्यक्त करायचे होते. यातील नाटक स्वरूपात पंढरपूर सिंहगडच्या आकांक्षा पवार हिने 'तंत्रज्ञान, मोबाईल आणि इंटरनेट' यांचे मनावर होणारे फायदे आणि दुष्परिणाम विचार व्यक्त केले होते.

आंतरराष्ट्रीय डिजिटल डीटाॅक्स काळाची गरज या स्पर्धेचे बक्षीस वितरण ५ डिसेंबर २०२३ रोजी मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे.

राष्ट्रीय स्तरावरील कुमारी अनुजा पाटील हिने द्वितीय तर कुमारी आकांक्षा पवार हिने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, पब्लिकेशन्स डीन डॉ. संपत देशमुख, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT