Car Damage sakal
पुणे

Crime News : अंगावर चिखल उडाला म्हणून वाद; दहा ते बारा जणांनी कोयत्यांनी केली वाहनांची तोडफोड

अंगावर चिखल उडाला म्हणून झालेल्या वादातून दहा ते बारा जणांच्या टोळीने डोणजे येथे एक दुचाकी व एका कारची कोयत्यांनी तोडफोड करत दहशत निर्माण केल्याची घटना घडली.

निलेश बोरुडे

सिंहगड - अंगावर चिखल उडाला म्हणून झालेल्या वादातून दहा ते बारा जणांच्या टोळीने डोणजे येथे रात्रीच्या वेळी येऊन एक दुचाकी व एका कारची कोयत्यांनी तोडफोड करत दहशत निर्माण केल्याची घटना घडली आहे.

इजाज मुनीर शेख (वय 21, रा. डोणजे, ता. हवेली) या तरुणाने याबाबत हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार शिवप्रसाद उर्फ मन्या किसन चोरघे(अंदाजे वय 22 वर्ष) याच्यासह त्याच्या दहा ते बारा अज्ञात साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी धायरी परिसरातील आहेत.

फिर्यादी इजाज हा डोणजे येथील त्याच्या घराजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला थांबलेला असताना(दि.16) सिंहगडाकडून येणाऱ्या दुचाकीमुळे त्याच्या अंगावर चिखल उडाला. त्यातून इजाज व दुचाकीवरील तरुणांची शाब्दिक बाचाबाची व हाणामारी झाली.

स्थानिकांनी मध्यस्थी करुन ही भांडणे सोडवली. दुसऱ्या दिवशी (दि. 17) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अचानक तोंडाला रुमाल बांधून, हातात मोठमोठे कोयते घेऊन दहा ते बारा जण दुचाकींवरुन आले व मोठ्या आवाजात शिवीगाळ करत एक स्विफ्ट कार व बुलेट मोटारसायकलची तोडफोड केली.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे इजाज व त्याच्या घरातील सर्व सदस्य घाबरले होते. तसेच परिसरातही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलीसांनी विश्वास दिल्यानंतर इजाज शेख याने तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी अधिकारी आयपीएस अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश धनवे याबाबत अधिक तपास करत आहेत.

'कोयता गँगचे प्रकार आमच्या भागात खपवून घेतले जाणार नाहीत. आम्ही सर्व पीडितांना विनंती करतो की अशा टोळ्यांची माहिती द्या जेणेकरून त्यांच्यावर कायद्याने कारवाई केली जाईल. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे.'

- अनमोल मित्तल, प्रभारी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT