Sinhgad Ghat Road
Sinhgad Ghat Road sakal
पुणे

Sinhgad Ghat Road : धोकादायक प्रवास; प्रशासनाचे दुर्लक्ष; मोठ्या अपघाताची भीती

नीलेश बोरुडे

सिंहगड - सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे मागील काही वर्षांपासून सिंहगडाचा घाट रस्ता जीवघेणा बनला आहे.‌ सध्याही घाट रस्त्यावर जागोजागी लहान-मोठी दरड कोसळून दगड-मातीचे ढीग दिसत आहेत. या रस्त्यावरून दररोज हजारो पर्यटकांसह स्थानिक रहिवासी व विक्रेत्यांची ये-जा असते. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने कधी पाहणार असा प्रश्‍न आहे.

वाहतूक कोंडीच्या वेळी काय?

शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी सिंहगडाच्या घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. कोंढणपूर फाट्यापासून गाडीतळापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातच पाऊस सुरू झाल्यानंतर पर्यटक डोंगरकपारीच्या आडोशाला उभे राहतात. अधांतरी अडकलेले मोठे दगड किंवा डोंगराचा भाग कोसळल्यास भीषण परिस्थिती उद्भवू शकते. अशावेळी मदत व बचाव कार्य करण्यातही मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने अगोदरच या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला दरड प्रतिबंधक काम करण्यासाठी तत्काळ निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, लवकरात लवकर काम सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे तेथे पर्यटकांना सूचना देण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तसे फलकही लावण्यात आलेले आहेत.

- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी

अशी आहे स्थिती

  • पाऊस सुरू झाल्यानंतर मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दररोज सरासरी पाच ते दहा हजारांपर्यंत पोचली आहे.

  • शनिवार व रविवारी हा आकडा दुप्पट झालेला दिसून येतो.

  • बहुतांश पर्यटक दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने घाट रस्त्यावरून गडावर जातात.

  • घाट रस्त्यावर गोळेवाडी येथील तपासणी नाक्यापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत धोकादायक दरड आहे.

  • वर्षभर येथे मोठमोठे दगड कोसळून रस्त्यावर येत असतात.

  • या ठिकाणी अत्यंत तीव्र वळण व उतार असल्याने दरड कोसळत असताना वाहन तेथे असल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.

  • घाट रस्त्यावर इतरही आठ ते दहा ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

पंधरा दिवसांतील वाहनांची संख्या व उपद्रव शुल्क

दुचाकी - १३,६८४

चारचाकी - ५,३४०

एकूण उपद्रव शुल्क - १२,२१,२००

समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे की, ‘‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’’. यत्न तोचि देव जाणावा. प्रयत्न करा, कार्य करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. प्रयत्न केल्यास वाळूतूनदेखील तेल गळू शकते. त्यासाठी सर्वप्रथम काम करायला सुरुवात केली पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांनी हा उपदेश लक्षात ठेवावा. सिंहगड घाट रस्ता दरवर्षी पावसाळ्यात दरडीमुळे धोकादायक होतो.

यावर योग्य नियोजन करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. मोठी दुर्घटना घडल्यावर जागे होण्यापेक्षा ‘आधी केलेची पाहिजे’ हे लक्षात ठेवून उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांनो याबाबत आपल्या सूचना नावासह क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर, तसेच ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT