Sinhagad Road Traffic Jam esakal
पुणे

Pune Traffic Update: एक चेंबर तुटला अन् अख्खा सिंहगड रस्ता झाला जाम ! वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त..

Sinhagad Road Traffic Jam: राजाराम पूलाजवळील एका चेंबरमुळे संपूर्ण सिंहगड रोडने अनुभवली वाहतूक कोंडी

जागृती कुलकर्णी

सिंहगड रस्ता, ता. १५ : राजाराम पुलाच्या पुढे तुटलेल्या केवळ एका चेंबरमुळे सिंहगड रस्ता परिसरात नागरिकांना वाहतूक कोंडीत सामोरे जावे लागले.

सिंहगड रस्त्याला विठ्ठलवाडी कडून दांडेकर पुलाकडे जाताना; फडके गणपती आणि वीर बाजी पासलकर सभागृह या भागातील पलीकडच्या रस्त्याला एक चेंबर तुटला होता. या चेंबरचे झाकण तुटल्यामुळे त्या ठिकाणी वाहन चालवण्यात अडचण निर्माण झाली. एका बाजूला पुलाचे काम दुसऱ्या बाजूला तुटलेला चेंबर यामुळे वाहतूक अतिशय धीम्या गतीने पुढे सरकत होती.

(Pune Traffic News)

परिणामी जनता वसाहत कडे जाणारा कालव्याशेजारील रस्ता, चावट पाटील चौक, आनंद विहार शेजारील रस्ता, विश्रांती नगर येथील प्रकाश इनामदार चौक, यासह सिंहगड रस्त्याला दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास सुरू झालेली वाहतूक कोंडी दुपारी बारा वाजेपर्यंत कायम होती. केवळ तुटलेल्या एका चेंबरमुळे सर्व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

राजाराम पुलाच्या पुढे चेंबर तुटल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आमचे सर्व सहकारी ही कोंडी सोडवण्यासाठी तत्परतेने काम करत होते. दरम्यान महापालिकेला कळून त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याचे सांगितले आहे.
राजकुमार बरडे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT