पुणे

नाशिक संक्षिप्त बातम्या

CD

साडेचारशे दूध संकलन
केंद्रांची माहिती मिळेना
सिन्नर : तालुक्यातील केवळ २० दूध संकलन केंद्रांकडूनच दूध संकलनाची माहिती प्रशासनाला दिली जात आहे. उर्वरित सुमारे ४५० केंद्रे सुरू असूनही त्यांच्याकडून माहिती मिळत नसल्याने या केंद्रांचीही माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे दूध संकलनाबाबतची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार, २० संकलन केंद्रांची मे ते सप्टेंबर या कालावधीतील महिनानिहाय माहिती उपलब्ध झाली. मात्र उर्वरित दूध संकलन केंद्रांकडून माहिती दिली जात नसल्याने या केंद्रांमध्ये संशयास्पद पद्धतीने दूध संकलन होत असावे, असा संशय बैरागी यांनी व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर
दीपप्रज्ज्वलन उपक्रम
पेठ : कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि पेठ पंचायत समितीतर्फे राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत तालुक्यात ‘एक दिवस आशीर्वादाचा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. बिरसामुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत २०२५-२६ या वर्षातील लाभार्थी असलेल्या गांगोडबारी येथील महिला शेतकरी पार्वताबाई संपत गवळी यांच्या शेतावर हा उपक्रम घेण्यात आला. गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी अधिकारी संतोष राठोड यांनी शेताच्या बांधावर जाऊन दीपप्रज्वलन केले. पार्वताबाई गवळी यांना नवीन विहिरीचा लाभ देण्यात आला असून, शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात येत आहे. या वेळी सहायक गटविकास अधिकारी सुनील बागूल, कृषी विस्तार अधिकारी जयवंत गारे, सचिन जाधव यांच्यासह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

मानोरी ग्रामपंचायतीच्या
कारभाराविरोधात उपोषण
सिन्नर : मानोरी ग्रामपंचायतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्याची चौकशी करावी आणि संबंधित प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, यांसह विविध मागण्यांसाठी अर्जुन कर्डेल यांनी दुसऱ्यांदा मानोरी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. गेल्या महिन्यातही कर्डेल यांनी उपोषण केले होते. त्या वेळी सात दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सहायक गटविकास अधिकारी ढवळे, विस्तार अधिकारी मच्छिंद्र कांगणे आणि सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी हे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने कर्डेल यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. करपण सांगळे, दीपक पवार, अक्षय शिंगाडे, रमेश सानप, सुदर्शन सानप, मारुती सानप आणि देवराम चकणे आदी ग्रामस्थांनी कर्डेल यांची भेट घेऊन उपोषणाला पाठिंबा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर! किरण सरनाईक सलग दुसऱ्यांदा विजयी, काँग्रेसच्या अदिती पोहरेंचा पराभव

Spain Train Accident: स्पेनमध्ये भीषण अपघात; २ हाय-स्पीड रेल्वेगाड्यांची धडक; ३० जणांचा मृत्यू

Supreme Court Recruitment: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी! 'कोर्ट मास्टर' पदासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट! किती टक्क्यांनी वाढला महागाई भत्ता?

Marathi News Live Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे किरण सरनाईक विजयी; काँग्रेसच्या अदिती पोहरे यांचा पराभव!

SCROLL FOR NEXT