actress bhagyashree mote with madhu markandeya sakal
पुणे

Pune News : बहिणीच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवावा; अभिनेत्री भाग्यश्री मोटेची उच्च न्यायालयात धाव

बहिण मधू मार्कंडेय यांच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावा, यासाठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बहिण मधू मार्कंडेय यांच्या मृत्यूचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावा, यासाठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मधू यांचा वाकड येथे १२ मार्च रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता.

शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. परंतु पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याचा दावा करीत तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी अभिनेत्री भाग्यश्रीने केली आहे.

भाग्यश्री मोटेच्या म्हणण्यानुसार, मधू यांच्या मृत्यूच्या तीन आठवड्यापूर्वी त्यांचे पती संकेत मार्कंडेय यांचे निधन झाले होते. मधू या केक बनविण्याची कार्यशाळा घेणार होत्या.

याबाबत त्यांची पिंपरी येथील एका महिलेशी तीन-चार महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. केक वर्कशॉपसाठी मधू आवश्यक साहित्य घेऊन घराबाहेर पडल्या होत्या. त्या एका महिलेसमवेत गेल्या होत्या. ती खोली निर्जनस्थळी असून, सीसीटीव्ही चित्रीकरणानुसार त्या दीड तास खोलीत होत्या. मधू तेथे चक्कर येऊन कोसळल्या. त्यांना पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले.

परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत वाकड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून मधू यांचा मोबाईल जप्त केला. परंतु तो लॉक असल्यामुळे न्यायवैद्यकीय विभागाला अद्याप उघडता आलेला नाही.

परंतु सासरच्या काही व्यक्तींनी धमकावल्याचे मधू यांनी सांगितले होते. या अनुषंगाने तपास करावा, मधू यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मोबाइलमध्ये काही पुरावे आढळून आले का? मृत्युपूर्वी त्यांचे कोणाशी बोलणे झाले? असे प्रश्न अभिनेत्री भाग्यश्रीने उपस्थित केले आहेत. दरम्यान, मधू यांच्या मृत्यूबाबत सर्व शक्यता पडताळून तपास केला आहे. त्यांना तपासाबाबत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येतील, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

माझ्या बहिणीला न्याय द्या...

‘मधू यांच्या चेहऱ्यावर नखांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. व्हिसेराच्या अहवालानुसार हृदय बंद पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु तपासाच्या नावाखाली माहिती दिली जात नाही. आम्हाला मृत्यूबाबत संशय आहे. माझ्या बहिणीला न्याय द्या,’ अशी भावनिक पोस्टही भाग्यश्रीने सोशल मीडियावर केली आहे. सात महिने उलटूनही पोलिसांना मृत्यूचे नेमके कारण तपासता आलेले नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे भाग्यश्रीने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT