पुणे

खांद्यावर बहिणीचा सांगाडा...वेशीवर व्यवस्थेची लक्तरे!

CD

केंदुझार (ओडिशा), ता. २८ (वृत्तसंस्था) : व्यवस्थेतील किचकट अटी, प्रक्रियेचा गुंता आणि संवादाचा अभाव या तिन्हींचा फटका सर्वसामान्य नागरिकाला किती क्रूरपणे बसू शकतो, याचे अस्वस्थ करणारे उदाहरण ओडिशात सोमवारी पाहायला मिळाले. फक्त १९,३०० रुपयांसाठी एका भावाला आपल्या मृत बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेच्या दारात जावे लागले. या घटनेने व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली.
मल्लिपासी गावातील ५० वर्षीय जीतू मुंडा यांची मोठी बहीण कालरा मुंडा यांचे २६ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या नावावर ओडिशा ग्रामीण बँकेच्या मल्लिपासी शाखेत १९,३०० रुपये जमा होते. ही रक्कम जीतू यांच्यासाठी केवळ पैसे नव्हते, तर जगण्याचा आधार होती. बहिणीच्या निधनानंतर ते हे पैसे काढण्यासाठी अनेक दिवस बँकेत खेपा मारत होते. मात्र, खाते बहिणीच्या नावावर असल्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यांना मृत्यूचा पुरावा आणि इतर कागदपत्रे आणण्यास सांगण्यात आले. इथेच संवादाची दरी स्पष्ट दिसली. कारण जीतू पूर्णपणे अशिक्षित आहेत. ‘पुरावा’ म्हणजे नेमके काय, हे त्यांना समजले नाही. ‘‘खातेदाराला घेऊन या,’’ या वारंवार सांगितल्या जाणाऱ्या सूचनेचा त्यांनी शब्दशः अर्थ घेतला आणि त्यातून त्यांनी धाडसी पाऊल उचलले. हताश आणि असहाय्य अवस्थेत जीतू स्मशानभूमीत गेले. त्यांनी बहिणीचे थडगे खोदले, तिचा सांगाडा बाहेर काढला आणि तो एका कपड्यात गुंडाळला. रखरखत्या उन्हात सुमारे तीन किलोमीटर चालत ते थेट बँकेत पोहोचले. बँकेच्या टेबलावर सांगाडा ठेवत त्यांनी जणू आपल्या वेदनेचा निःशब्द आक्रोशच व्यक्त केला.

कर्मचारी घाबरले

बँकेत मानवी सांगाडा पाहताच कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घाबरलेल्या व्यवस्थापनाने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांसमोर जीतू यांनी दिलेले उत्तर मन सुन्न करणारे होते, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ‘‘मी वारंवार विनंती केली; पण तुम्ही तिला घेऊन या म्हणालात. म्हणून आज तिला घेऊन आलो आहे,’’ असे ते म्हणाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. पाटणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण प्रसाद साहू यांनी सांगितले की, जीतू पूर्णपणे अशिक्षित असून त्यांना कायदेशीर प्रक्रिया किंवा वारस हक्कांविषयी काहीही माहिती नव्हती. बँकेकडूनही ही प्रक्रिया समजावून सांगण्यात दिरंगाई झाली होती. पोलिसांनी त्यांची समजूत काढली आणि मृत्यू प्रमाणपत्र आणण्याची योग्य प्रक्रिया समजावून सांगितली. त्यानंतर जीतू बहिणीच्या मृत शरीराचे अवशेष घेऊन परत गेले. या धक्कादायक घटनेनंतर बँकेनेही आपली भूमिका बदलत जीतू यांना संबंधित रक्कम तातडीने मिळावी यासाठी पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT