पुणे

कऱ्हाड आरोग्याच्या योजनांतील बोगसगिरीची एसआयटीकडून चौकशी

CD

आरोग्‍य योजनांची एसआयटी चौकशी
आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्‍य योजनांची बोगसगिरी; जिल्ह्यातही होणार तपास

सचिन शिंदे : सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, ता. १९ : आजारपणाने आलेल्या संकटावर मात करताना अनेकजण घाईला येतात. त्यात बदल व्हावा, यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य आणि विस्तारित आयुष्मान भारत योजना सुरू केली. मात्र, त्याच लोककल्याणकारी योजनांचा गैरफायदा घेत काही खासगी रुग्णालये आणि यंत्रणांनी संगनमत करत बिलात बोगसगिरी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या योजनांतील तक्रारींबाबत विशेष पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील महात्मा फुले व आयुष्मान भारत योजनेतील बोगसगिरीची चौकशी असल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या कऱ्हाडसह सातारा, फलटण, वाई आणि माण-खटाव तालुक्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत योजना जोरात चालतात. त्यातून शेकडो रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार होत आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातून अनेकदा तक्रारीचे सूर येत आहेत. सोप्या आजारालाही मोठे स्वरूप देऊन योजनांचे पैसे फुगवले जात जातात. त्या तक्रारीही वाढत आहेत. यापुढे अशा बोगसगिरीच्या तक्रारी झाल्या, की त्याची चौकशी एसआयटीकडून होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्या नामांकित आणि ग्रामीण रुग्णालयांत शासकीय योजना आहेत, त्यांच्यावर शासनाची नजर आहे.
बोगसगिरीची तक्रार झाल्यास चौकशीचा ससेमिरा मागे लागण्याच्या भीतीने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. शासकीय योजनातील बोगसगिरी रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा सामान्यांना होणार आहे.
..............................
डॉ. प्रवीण गेडाम देणार अहवाल
शासनाने एसआयटीची स्थापना केली असून, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून अशा बोगसगिरीचा अभ्यास होणार आहे. त्यानंतर त्याचा अहवाल दिला जाणार आहे. सध्या त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.
......................................
यावर होणार परिणाम
- तक्रारींच्या सखोल चौकशीच्या निर्णयामुळे गरिबांपर्यंत थेट लाभ पोहोचणार
- बोगस दाव्यांमुळे हक्काच्या रुग्णांचे क्लेम कठोर भूमिकेमुळे मंजूर होणार
- ग्रामीण आणि सरकारी रुग्णालयांत कमिशनसाठी योजनांचे जाळे पसरवणाऱ्या दलालांची दुकाने बंद पडणार
.................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PF Rule Change: पीएफचे नियम बदलले! आता 90% रक्कम काढता येणार, फक्त 2 महिन्यांची अट; नोकरदारांना मोठा दिलासा!

SA vs BAN 1st Test : १२ धावांचे लक्ष्य अन् दक्षिण आफ्रिकेचा ९ चेंडूंत विजय! WTC Final च्या शर्यतीत मोठी उलथापालथ, भारताच्या स्वप्नांना धक्का; समजून घ्या गणित

आधी चाकूहल्ला, आता पुन्हा जीवे मारण्याची धमकी! सैफ अली खानला धमकी देणारी व्यक्ती कोण?

PUC Certificate Validity: तुमच्या गाडीचा PUC किती दिवस वैध राहणार? मुदत संपल्यास काय होणार? केंद्र सरकारचे नवे नियम जाणून घ्या!

Marathi News Live Updates : तामिळनाडू विधानसभेचे आमदार व्ही. एस. बाबू यांचे निधन

SCROLL FOR NEXT