पुणे

सीता शेळके यांना आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार अहिल्यानगरच्या लेफ्टनंट कर्नलचा गौरव

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २३ ः दोन वर्षांपूर्वी केरळच्या वायनाडमध्ये आलेला महापूर व भूस्खलनाच्या वेळी नागरी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून व्यापक प्रमाणावर मानवीय मदत व आपत्ती निवारणाच्या मोहिमांचे नेतृत्व करणाऱ्या लष्करातील लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांची केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या यंदाच्या सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यासाठी सरकार दरवर्षी २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार जाहीर करते. सीता शेळके यांना वैयक्तिक विभागात तर सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला  संस्थात्मक विभागात यंदाच्या ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे.  
मूळच्या अहिल्यानगरच्या असलेल्या लेफ्टनंट कर्नल शेळके यांनी वायनाडमध्ये अस्मानी संकट कोसळले असताना अतिशय प्रतिकूल हवामानात अनेक धोकादायक बचाव मोहिमा यशस्वीपणे राबवून शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले. त्यांनी नागरी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून नागरिकांचे जलद स्थलांतर, मदतीचे वाटप आणि अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू केल्या. चुरालमला येथे त्यांनी अल्पावधीत १९० फूट लांबीचा बेली पूल उभारून दुर्गम गावांचा संपर्क पुनर्स्थापित केला. तसेच कोमात्सू पीसी-२१० 0 उत्खनन यंत्राचा प्रतिवजन म्हणून वापर केला आणि रात्रभरात केवळ चार तासांत तात्पुरता पादचारी पूल उभारण्यासारख्या अभिनव अभियांत्रिकी उपाययोजना राबवल्या. सुमारे दीडशे टन उपकरणे तातडीने वापरात आणून त्यांनी हजारो नागरिकांना वेळेत मदत व पुनर्वसनाचा लाभ मिळवून दिला.

दोन हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
ले.कर्नल शेळके यांनी दोन हजार ३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना आपत्ती प्रतिसाद व मानवीय मदत कार्याचे प्रशिक्षण दिले आहे. अभियांत्रिकी सेवेच्या माध्यमातून त्यांनी पूल, रस्ते आणि निवारे झटपट उभारून आपत्तीग्रस्त भागात मदतकार्य सुलभ केले. प्रभावी नेतृत्वाचे आणि आपत्ती जोखीम कमी करण्यात महिलांचा वाढत्या सहभाग त्यांच्या कार्यातून दिसला आहे. यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT