The situation will remain the same in Pune and Pimpri Chinchwad as before July 13 
पुणे

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय झाला; वाचा महत्त्वाची बातमी

मंगेश कोळपकर

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील लॉकडाउन आज मध्य रात्रीपासून संपुष्टात येत आहे. त्यामुळं उद्यापासून शहरांमध्ये कशी परिस्थिती असेल, याविषयी उत्सुकता होती. या संदर्भात आज विभागीय कार्यालयातील विशेष अधिकारी सौरव राव यांनी पत्रकारांशी संवाद साधून माहिती दिली. 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सौरव राव म्हणाले, 'उद्यापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील लॉकडाउन संपष्टात येतोय. त्या निर्णयात कोणताही बदल नाही. परंतु, शहरात 13 जुलैपूर्वीचे स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात आलेले नियम लागू होती. तर, राज्य सरकारने 31 जुलैपर्यंत लागू केलेल्या लॉकडाउनच्या नियमावलीचेही पालन करावं लागेल. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागणार आहे.'

काय सुरू असेल?
आरोग्य सेवेशी निगडीत सर्वकाही
सर्व प्रकारची दुकाने
भाजी, मंडई, बेकऱ्या 
पेट्रोलपंप
दारूची दुकाने   
खासगी कार्यालये  
रात्रीची संचारबंदी कायम असणार

दोन दिवसांचा लॉकडाउन?
देशात बेंगळुरू, कोलकाता अशा शहरांमध्ये आठवड्यातून दोन दिवस लॉकडाउनचा नियम लागू करण्यात आला. तसा निर्णय पुण्यात होऊ शकतो का? असा प्रश्न सौरव राव यांना विचारण्यात आला. त्यावर राव म्हणाले, 'या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. परंतु, अद्याप निर्णय झालेला नाही.' व्यापाऱ्यांना नियमावलीला विरोध करता येणार नाही, सरकारचे नियम पाळावे लागतील. मला आशा आहे की, पुण्यातील व्यापारी सर्व नियम पाळतील, अशी आशा राव यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : शेती उपसा सिंचन योजनेसाठी वीज कनेक्शन मिळावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT