PNE18O59846.jpg 
पुणे

#mynewspapervendor मंचरच्या शिंदे यांची सहा कोटींची उलाढाल 

सकाळवृत्तसेवा

मंचर (ता. आंबेगाव) : येथील बबनराव नामदेवराव शिंदे यांनी आंबेगाव तालुक्‍यातील मंचर ते डिंभे या मार्गावर असलेल्या गावांमध्ये "सकाळ' पेपरचे पार्सल पोचविण्याचे काम 17 वर्ष केले. संपर्क वाढल्याने पशुखाद्य विक्रीचा व कांदा बटाट्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. सुरवातीला खडतर प्रवास करत असताना भाड्याने घेतलेल्या घराचेही वेळेवर भाडे देता येत नव्हते. मात्र आज अविरत कष्टाच्या बळावर त्यांनी टोलेजंग बंगला बांधला आहे. "महालक्ष्मी ट्रेडर्स' व "महालक्ष्मी ट्रेडिंग' या त्यांच्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल आता 6 कोटींच्या पुढे असून त्यातून 20 जणांना रोजगार मिळाला आहे. 

खेड तालुक्‍यातल्या जऊळके बुद्रुक गावातून आलेल्या शिंदेंनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली. पण कुठेही नोकरी न मिळाल्यामुळे ते पत्नीसह रोजगारासाठी 1988 मध्ये मंचरला आले. "सकाळ'च्या एजंटकडून अंक घेऊन त्याचे छोट्या विक्रेत्यांना वाटप करणे सुरू केले. तसेच मंचर ते डिंभे या मार्गावरील अंकाचे पार्सल वृत्तपत्र विक्रेत्यांकडे पोचविण्याचे काम केले. पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय 1995 मध्ये सुरू केला. तसेच कांदा बटाटा व तरकारी भाजी खरेदी विक्रीचा व्यवसायही सुरू केला. व्यवसायाचा व्याप वाढल्याने 2005मध्ये त्यांनी पार्सल वाहतुकीचे काम बंद केले. दरम्यानच्या काळात त्यांनी मुलगा नितीन व मयूर यांना अनुक्रमे आयटी इंजिनिअर व कृषी पदवीधर केले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT