Corona positive  Sakal
पुणे

किरकटवाडी : सहा आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका सहायक आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर सहा आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रातील(Khadakwasla Primary Health Centre) एका सहायक आरोग्य अधिकाऱ्यांसह इतर सहा आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive)आले आहेत. खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील रुग्णसंख्याही वाढत असून, ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ८० च्या पुढे गेल्याने नागरिकांनी गर्दी टाळून व कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे (Corona rules)पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. वंदना गवळी यांनी केले आहे.

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण १५ कर्मचारी आहेत. यापैकी एक सहायक आरोग्य अधिकारी, तीन परिचारिका, एक लॅब टेक्निशियन व एक डाटा एन्ट्री ऑपरेटर असे एकूण सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसेच कोरोना तपासणीसाठी गर्दी वाढू लागली आहे. त्यातच आरोग्य केंद्रातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण निर्माण होताना दिसत आहे.

खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील नऱ्हे, नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी-सणसनगर व गोऱ्हे बुद्रुक या गावांतील नागरिकांसाठी आरोग्य केंद्रात कोरोना तपासणी सुरू आहे. वाढता संसर्ग लक्षात घेता दैनंदिन तपासण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून, ज्या नागरिकांना लक्षणे आहेत, त्यांना सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही डॉ. गवळी यांनी केले आहे.

गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या जास्त

सध्या ॲक्टिव्ह असलेल्या रुग्णांपैकी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे गृहविलगीकरणावर भर देण्यात येत असून, आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात येत आहेत. ज्या रुग्णांना तीव्र लक्षणे जाणवत आहेत. त्यांना पुणे महापालिकेचे लायगुडे रुग्णालय किंवा ससून रुग्णालयात पाठविण्यात येत असल्याचे डॉ. गवळी यांनी सांगितले.

कर्मचारी पॉझिटिव्ह आले असले तरी उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे लसीकरण, तपासणी व औषधोपचार ही कामे सुरळीत सुरू आहेत. नागरिकांनीही गर्दी टाळून व प्रतिबंधात्मक नियम पाळून सहकार्य करणे गरजेचे आहे.

- डॉ. वंदना गवळी, अधिकारी, खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT