Mokka crime Sakal
पुणे

Pune Crime : कोरेगाव पार्कमध्ये गोळीबार करणाऱ्या टोळीतील सहाजणांवर मोका

कोरेगाव पार्कमध्ये गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगार अजय काळुराम साळुंके याच्यासह सहाजणांवर पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरेगाव पार्कमध्ये गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगार अजय काळुराम साळुंके याच्यासह सहाजणांवर पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला असून, त्यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ही मोका कायद्यानुसार तिसरी कारवाई आहे.

याप्रकरणी सहाजणांवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात सहाजणांवर आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अजय काळुराम साळुंके ऊर्फ धार अज्या (वय २३), नितीन ऊर्फ नट्टा मोहन म्हस्के (वय ३२), संतोष सिद्धार्थ चव्हाण (वय २७), अजय ऊर्फ सोन्या गिरीप्पा दोडमणी (वय २६), नटी ऊर्फ रोहन ऊर्फ ऋषीकेश मोहन निगडे (वय २८, सर्व रा. ताडीवाला रोड, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. तर, अन्य एकजण फरारी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पूर्ववैमनस्यातून हवेत गोळीबार करुन दहशत माजवून एकाला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारुन खुनाचा प्रयत्न केला होता. हा प्रकार मागील २४ नोव्हेंबर रोजी कोरेगाव पार्कमधील गेरा लिजंट सोसायटीच्या पार्किंगमध्ये आणि योगी पार्क सोसायटीसमोर घडला होता.

अजय साळुंके हा टोळीप्रमुख असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि गंभीर दुखापत असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. नितीन ऊर्फ नट्टा मोहन म्हस्के याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत असे तीन गुन्हे दाखल आहेत. ऋषिकेश निगडे याच्याविरुद्ध दरोडा आणि गर्दी मारामारीचे दोन गुन्हे दाखल आहेत. या आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी बेकायदेशीररीत्या पिस्तूल बाळगून गुन्हेगारी सुरुच ठेवले होते.

दाखल गुन्ह्यामध्ये आरोपींविरुध्द मोका दाखल करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ यांनी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांना सादर केला होता. या प्रकरणाची छाननी करुन या टोळीविरुद्ध मोका कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Policy: मद्य व्यवसायात मोठे बदल! पारंपरिक मद्याला सरकारी मान्यता मिळणार; सरकारने लागू केले नवे नियम

Maharashtrachi Hasyajatra: प्रेक्षकांचा आग्रह सोनी मराठीने मानला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

Tragic Drowning: गोदावरीत अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्या बहिणी व त्यांना वाचवताना चुलतीचा बुडून मृत्यू; मोहळा गावावर शोककळा

INDW vs PAKW: T20 World Cup आज रंगणार सर्वात मोठा थरार! भारत-पाकिस्तान मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? वाचा सविस्तर

Ayodhya Ram Mandir Donation Scam: राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात खळबळजनक प्रकार उघड, कर्मचाऱ्याने घरात शेणाच्या ढिगाऱ्यात लपवले १० लाख रुपये

SCROLL FOR NEXT